एक्स्प्लोर

मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal: या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर विरुद्ध निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या पॅनलमध्ये चुरस रंगली होती. 17 जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलची सरशी झाली आहे. समर्थ पॅनलचे सर्व 14 ही उमेदवार विजयी झाले. बिनविरोध निवड झालेल्या तीनपैकी दोन जणांनी समर्थ पॅनेलला पाठिंबा दिला होता.  मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता आली आहे. या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर विरुद्ध निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या पॅनलमध्ये चुरस रंगली होती. 17 जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणामध्ये होते. 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक तब्बल नऊ वर्षानी झाली. राज्यातील पाच ठिकाणी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचे मतदान झाले. या निवडणुकीमध्ये केवळ 50 टक्के मतदान झाले होते. कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर नाशिक या ठिकाणी मतदान पार पडले. या मतदानामध्ये मुंबईत सर्वात कमी प्रतिसाद मिळाला. राजकीय हस्तक्षेपाने ही निवडणूक प्रचंड चर्चेची बनली होती. 

वर्षा उसगावकर यांनी चित्रकर्मी पॅनलला समर्थन दिले

माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल आणि अभिनेते आनंद काळे यांच्या चित्रकार्मी पॅनल यांच्यात थेट लढत झाली. अभिनेत्री  विभागातून वर्षा उसगावकर यांची, विभागातून ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांची तर संकलन विभागातून विजय खोचीकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर आनंद शिंदे आणि विजय खोचीकर यांनी समर्थ पॅनेलला आपले समर्थन दिले. तर अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी चित्रकर्मी पॅनलला समर्थन दिले. त्यामुळे 17 जागांपैकी 14 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये 16 जागांवर समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे 17 पैकी 16 जागा जिंकत समर्थ पॅनलने निर्विवाद वर्चस्व कायम राखले. गेल्या काही वर्षांत रखडलेली विकासकामे पूर्ण करून महामंडळाचे नाव अधिक उज्ज्वल करण्याचा विश्वास मेघराज भोसले यांनी व्यक्त केला.

निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरही अंधश्रद्धेचा बाजार

दरम्यान, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज असतानाच लिंबू फिरवण्याचा प्रकार मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दिसून आला. मतमोजणी हॉलबाहेर तीन लिंबू आणि अंगारा ठेवल्याचे पाहायला मिळालं.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget