एक्स्प्लोर

अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

आरोपी सुयोग सोळुंकेवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाईही देखील करण्यात आली होती.

जालना : बीड आणि जालना (Jalna) जिल्ह्यातील एकाच दिवसात झालेल्या दोन लाचखोरीच्या प्रकरणाने महाराष्ट्रातील भ्रष्ट प्रशासकीय सेवेचा दाखलाच समोर आणला. या कारवाईनंतर सोशल मीडियातून स्वागत झालं, पण तहसीलदारसारख्या उच्च पदस्थ व्यक्तीकडून अशाप्रकारे लाच घेतल्यावरुन संतापही व्यक्त झाला आहे. आता, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या गाजलेल्या लाच प्रकरणात चांगलाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे, याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. अंबड लाच (Bribe) प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालन्यातील गोंदी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू चोरीचे दोन गुन्हे दाखल होते, याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण, 2025 मध्ये दाखल गुन्ह्यात त्याला आजपर्यंत अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. 

आरोपी सुयोग सोळुंकेवर अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि मारहाणीसह विविध गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाईही देखील करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याची या कारवाईतून जामीनावर सुटका करण्यात आली होती. दरम्यान, अवैध वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणारे पोकलेन मशीन आणि सहा हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी सोळुंके याने तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना रंगेहाथ अटक केली होती. आता वाळू चोरीच्या गुन्ह्यात सुयोग सोळुंके याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपी सुयोग सोळुंकेवर यापूर्वी एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलीस ठाणे गोंदी गु र नं 217/2025, 218/2025, 230/2025 सर्व कलम 303(2),3(5) भा न्या सं सह कलम 3, 4 गौण खनिज (विकास व विनियमन) प्रतिबंध अधिनियमान्वये अटक करण्यात आली होती. याप्रकरणात, त्याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 

एकाच दिवशी एसीबीच्या दोन धाडी

एसीबीने शनिवारी एकाच दिवशी दोन ठिकाणी धाड टाकत आधी पोलीस (Police) अंमलदारास 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तर, दुसऱ्या धाडीत थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना बीड एसीबीने रंगेहात अटक केली. तत्पूर्वी, जालना एसीबीने बीडमधील नेकनूर येथे जाऊन पोलीस अंमलदारास लाच घेताना अटक केली. या दोन्ही कारवायांमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

 

हेही वाचा

इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
Raigad Crime News: महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime News: ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
मोशीत नैसर्गिक की पालिकेच्या चुकांमुळं आपत्ती? दुर्घटनेकडे मंत्री-लोकप्रतिनिधींची पाठ; नातेवाईकांकडून आरोपांच्या फैरी, आयुक्तांच्या कार्यप्रणालीवरही संशय
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0; ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटी रुपयांचा रेट
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
Embed widget