Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आरोग्य यंत्रणेच्या सभेनेची लक्तरं वेशीवर. स्ट्रेचर नसल्याने रुग्ण पतीला पाठीवर घेऊन धावपळ करणाऱ्या महिलेला मिळाली नाही मदत. रुग्णालयाचा 'वार्डबॉय' तंबाखू चोळण्यात मग्न..
पाठीवर घेतलेला आजारी पती... समोर छातीशी लटकवलेली बॅग... अन मागे मागे चालत असलेली या महिलेची छोटीशी निरागस मुलगी... अन 'ती' जीवाच्या आकांताने आपल्या पतीला उपचार मिळावा यासाठी रुग्णालयातील प्रत्येकाला कुठे मदत मिळेल हे विचारतेय... यावेळी रुग्णालयातला कोणी कर्मचारी तंबाखू चोळत असतो.. तर कुणाचं तिच्याकडे लक्ष नसतंय... तिची मात्र एकच तगमग... की ब्रेन स्ट्रोकमुळे अपंगत्व आलेल्या आपल्या धन्याला उपचार मिळावा... हे भयावह चित्र आहे 'विश्वगुरू' होण्याचे ढोल बडवणाऱ्या आपल्या भारत देशातील.... अन हा प्रकार आहेय गतिशील सरकारचा दावा करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील.... अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार आणि असंवेदनशीलतेची लक्तरं अक्षरशः वेशीवर टांगल्या गेलीयेत.
अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील या संवेदनशील आणि भोंगळ कारभाराचा व्हिडिओ चित्रित केलाय अनुराधा नाठे नावाच्या या तरुणीने... रुग्णालयाचा कारभार रोज कसा चालतो यावर भाष्य करणारा हा बोलका व्हिडिओ... मात्र, हा व्हिडिओ शूट करताना रुग्णालय प्रशासनाने आपल्याला अटकाव केल्याचा आरोप या तरुणीने केलाय.
यासंदर्भात 'एबीपी माझा'ने अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय. मात्र त्यांनी 'इन कॅमेरा' काहीही बोलायला नकार दिलाय.
All Shows
































