search
×

Cash Payment : आता कॅश पेमेंटवरही सरकारची नजर, नवीन वर्षाआधी नवा ITR फॉर्म

ITR Rule : नवीन वर्ष सुरु होण्याआधी आयकर विभागाने नवीन आयटीआर (ITR Form) फॉर्म जारी केला आहे. याद्वारे आता सरकार तुमच्या कॅश पेमेंटवरही नजर ठेवणार आहे.

FOLLOW US: 
Share:

Cash Payment ITR : नवीन वर्षात (New Year 2024) तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला कॅश व्यवहाराची (Cash Payment) माहिती तुम्हाला प्राप्तीकर विभागाला द्यावी लागेल. अलिकडच्या काळात भारतात डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Transaction) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असं असली तरी अजनही बरेच जण रोख व्यवहार (Cash Payment) करण्यास प्राधान्य देतात. कॅश व्यवहार करणाऱ्यांसाठी बातमी महत्त्वाची आहे. सरकार आता डिजिटल पेमेंटप्रमाणे (Digital Payment) कॅश पेमेंटवरही नजर ठेवणार आहे. नवीन वर्ष सुरु होण्याआधी आयकर विभागाने नवीन आयटीआर फॉर्म जारी केला आहे. याद्वारे आता सरकार तुमच्या कॅश पेमेंटवरही नजर ठेवणार आहे. नवीन वर्षाआधी प्राप्तीकर विभागाने नवीन आयटीआर (ITR) आणला आहे. 

कॅश पेमेंटवरही सरकारची नजर

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी नवीन ITR फॉर्म जारी केले आहेत. गेल्या वर्षी, नवीन ITR फॉर्म फेब्रुवारीमध्ये जारी करण्यात आले होते, पण यावेळी सरकारने डिसेंबर महिन्यामध्येच नवीन आयटीआर फॉर्म जारी केले आहेत. 2024-25 आर्थिक वर्षासाठी जारी केलेल्या या फॉर्ममध्ये, तुम्हाला आर्थिक वर्ष 2023-24 मधील तुमच्या कमाईचा तपशील भरावा लागणार आहे.

बँकेचा तपशील

देशात रोख व्यवहार (Cash Payment) कमी करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. देशभरात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामुळे एका दिवसात रोख रक्कम घेण्याची मर्यादाही फक्त 2 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आता आयटीआर फॉर्ममध्येही रोख व्यवहारांची (Cash Payment) माहिती भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

तुम्हाला चालू आर्थिक वर्षातील व्यवहारांमध्ये गुंतलेल्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागेल. यासोबतच त्यांना बँक खात्याच्या प्रकाराचीही माहिती द्यावी लागणार आहे. आयटीआर-1 (ITR-1) हा फॉर्म 50 लाख वार्षिक उत्पन्न असणारी कोणतीही व्यक्ती भरू शकते. पगार, मालमत्ता आणि शेतीतून हे उत्पन्न मिळतं अशा व्यक्ती आयटीआर-1 फॉर्म भरू शकतात.

रोख व्यवहारांची माहिती द्यावी लागणार

तुम्हाला आता आयटीआर भरताना कॅश पेमेंट म्हणजेच रोख व्यवहारांची माहिती द्यावी लागणार आहे. जर तुम्ही HUF किंवा कौटुंबिक व्यवसाय याशिवाय मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये असाल तर तुम्हाला ITR-4 किंवा संगम फॉर्म भरावा लागेल. यासाठी एकूण उत्पन्नाची यादी 50 लाख रुपये असेल. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, या फॉर्ममध्ये तुम्हाला रोख स्वरूपात मिळालेल्या रकमेची माहिती देखील भरावी लागणार आहे.

गेल्या वर्षी सरकारने आयटीआर फॉर्ममध्ये क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचे कलम देखील जोडलं होतं. यावर्षी सरकारने आयटीआर फॉर्ममध्ये रोख व्यवहारांची माहिती भरणं बंधनकारक केलं आहे. 

Published at : 25 Dec 2023 02:33 PM (IST) Tags: income tax new year business ITR New Year 2024 Cash Payment

आणखी महत्वाच्या बातम्या

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

पगार येतो पण पैसा टिकत नाही, नेमकं काय करावं? 'हा' फॉर्म्युला वापरा, भरपूर पैसे मिळवा

नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

नोकरी करता करता 'या' मार्गाचा अवलंब करा, पगारापेक्षा जास्त पैसे मिळवा, सविस्तर माहिती एका क्लिकवर

तरुण व्यावसायिक: बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह संपत्तीनिर्मितीची सुरुवात करा

तरुण व्यावसायिक: बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझीटसह संपत्तीनिर्मितीची सुरुवात करा

कागदपत्रांशिवाय तत्काळ मिळवा रोख कर्ज; तातडीच्या रोख कर्जाच्या मदतीने तुम्ही सर्व लहान आणि मोठे खर्चांचे आरामात व्यवस्थापन करा

कागदपत्रांशिवाय तत्काळ मिळवा रोख कर्ज; तातडीच्या रोख कर्जाच्या मदतीने तुम्ही सर्व लहान आणि मोठे खर्चांचे आरामात व्यवस्थापन करा

Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली

Stock Market Opening : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 73,000 तर, निफ्टी 150 अंकांनी खाली

टॉप न्यूज़

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?