इंस्टंट पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी विचारात घ्यावयाच्या 4 महत्त्वाच्या गोष्टी
इंस्टंट पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय आहे. त्यावर लगेच प्रक्रिया करून तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि तुम्हाला कर्जाची रक्कम नियमित पर्सनल लोनपेक्षा लवकर मिळते.
Bajaj Finserv Insta Personal Loan: कर्ज घेणे ही तशी फार किचकट प्रक्रिया आहे, आता ही प्रक्रिया सोपी झाली आहे. त्यातच इंस्टंट पर्सनल लोन हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यावर लगेच प्रक्रिया करून तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते आणि तुम्हाला कर्जाची रक्कम नियमित पर्सनल लोनपेक्षा लवकर दिली जाते. आपात्कालीन परिस्थिती ज्यांना तातडीने निधीची म्हणजे कर्जाची गरज आहे, त्यांच्यासाठी इंस्टंट पर्सनल लोन हे एक जलद आणि सोयीने कर्ज घेण्याचा पर्याय आहे.
तुम्हाला एखाद्या अनपेक्षितपणे वैद्यकीय कारणासाठी पैशांची आवश्यकता असेल, तुमच्या मुलांच्या महाविद्यालयाची शैक्षणिक फी भरायची असेल किंवा घराची दुरुस्ती आणि नूतनीकरण करणं, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी इंस्टंट लोनचा पर्यात उत्तम आणि अत्यंत सोयीस्कर ठरू शकतो. इंस्टंट पर्सनल लोन ही कर्ज घेण्याची असुरक्षित पद्धत असल्याने, कर्जदाते यासाठी अधिक जोखीम पत्करतात आणि कर्ज घेतात. तुमचं उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, वय आणि कामाचा अनुभव या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टींचा तुमच्या इंस्टंट पर्सनल लोन मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
काही वेळा तुम्हाला पूर्व-मंजूर इंस्टंट लोन उपलब्ध होतो. बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन च्याबाबतीत, काही विद्यमान ग्राहकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे पूर्व-मंजूर निधी उपलब्ध आहे तर, नवीन ग्राहक आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी समाविष्ट करुन त्यांना असलेली ऑफर जाणून घेऊ शकतात.
तुम्ही जर इंस्टंट पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्या कोणत्या ते जाणून घ्या.
1. पात्रता निकष
इंस्टंट पर्सनल लोन बहुतेक वेळा कर्ज पूर्व-मंजूर असले तरी तुम्हाला मिळणारी ऑफर काही पात्रता अर्जदारासंबंधित घटकांवर अवलंबून असते. याची आवश्यकता कर्जदात्यानुसार बदलू शकतात, यामध्ये वय, व्यवसाय (पगारदार किंवा स्वयंरोजगार) आणि उत्पन्न यांचा समावेश असू शकतो. कर्जदाराचे वय 21 ते 67 वयोगटातील असावे, अशी बहुतेक कर्जदात्यांची अट असते. याव्यतिरिक्त, सिबिल स्कोअर 759 आणि त्याहून अधिक असल्यास तुम्हाला तुमच्या लोन ऑफरवर चांगली डिल मिळण्यास मदत होऊ शकते.
2. तुमची एकूण आर्थिक स्थिती
तुम्हाला जेव्हा पैशांची त्वरित गरज असते तेव्हा इंस्टंट पर्सनल लोन हा एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु ते कर्ज तुमच्या परतफेडीच्या क्षमतेत बसतं की नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पूर्व-निर्धारित कालावधीत समान मासिक हप्त्यांमध्ये (ईएमआय) लोनची रक्कम परत केली पाहिजे. या ईएमआयमध्ये मूळ रक्कम आणि व्याजाचा समावेश असतो. तुम्ही परतफेड करण्याची तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकता याची खात्री करुन घेण्यासाठी तुमच्या एकूण आर्थिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे. कर्ज देणाऱ्या बऱ्याच संस्थांकडे ईएमआय कॅलक्युलेटर सहज उपलब्ध असतात, ज्यामध्ये तुम्ही कर्जाची रक्कम, व्याजदर आणि कालावधी निवडून संबाव्य ईएमआय देय रक्कम पाहू
3. क्रेडिट स्कोअर
क्रेडिट स्कोअर हे सगळ्यात महत्त्वाच्या निकषांपैकी एक आहे, यामुळे तुम्हाला कर्ज मिळण्यासाठीची पात्रता निश्चित होते. तुम्ही लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा आणि तुम्ही कर्जदात्याच्या गरजा पूर्ण करता का ते पाहा. यामुळे तुमचा कर्जासाठीचा अर्ज स्वीकारला जाण्याची शक्यता अधिक होईल. पूर्व-मंजूर ऑफरच्या बाबतीत, उच्च क्रेडिट स्कोअरमुळे चांगले डिल मिळण्यास मदत होते.
4. अटी आणि शुल्क
कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना, अर्ज केल्यानंतर कोणतेही अनपेक्षित शुल्क आणि अतिरिक्त कर आकारला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. आकारलं जाणारं शुल्क आणि त्यासोबत येणार्या दंडाबद्दल जाणून घेण्यासाठी बारीक अक्षरात छापलेला मजकूर काळजीपूर्वक वाचा. अशाप्रकारे, कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्यासंबंधित अटी आणि शर्ती जाणून घेऊ शकता.
या सोप्या टिप्स तुम्हाला तुमच्या गरजांसाठी योग्य इंस्टंट पर्सनल लोन निवडण्यास मदत करतील. 60 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसह आणि बहुतांश प्रकरणी 30 मिनिटे ते चार तासांदरम्यान वितरण कालावधीसह, तुमचा अनपेक्षित खर्च भरुन काढण्यासाठी बजाज फिनसर्व्ह इंस्टा पर्सनल लोन हा एक आदर्श पर्याय आहे. बजाज फिनसर्व्ह वेबसाइटला भेट द्या आणि आजच तुमची ऑफर तपासा.
टीप : हा लेख प्रायोजित आहे. ABP नेटवर्क किंवा ABP LIVE या लेखामध्ये व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार आणि/किंवा उत्तरदायी असणार नाही. या लेखामध्ये सांगितलेली वैशिष्ट्ये, मते, घोषणा, यांची वाचकांनी पुष्टी करण्याचा सल्ला दिला जातो.