Amul Franchise Business: 'अमूल'सोबत करा व्यवसाय; कमी वेळेत मिळू शकतो चांगला फायदा
Amul Franchise Business: अमूलसोबत व्यवसाय करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. जाणून घ्या व्यवसायाबाबतची माहिती...
Amul Franchise Business: सध्या अनेकांचा कल आता नोकरीऐवजी व्यवसाय करण्याकडे वाढत चालला आहे. अनेकजण विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असतात. वर्षातील बाराही महिने डेअरी उत्पादनांना मागणी असते. दूध (Milk), दही (Curd), आईस्क्रीम (Ice Cream) इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय सुरू करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. देशातील सर्वात मोठी डेअरी कंपनी अमूलने (Amul) लोकांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अमूलकडून फ्रँचायझीची ऑफर (Amul Franchise Offer) देण्यात येत आहे. तुम्हीदेखील या माध्यमातून चांगली कमाई करू शकता. तुम्हालाही ही फ्रँचायझी घ्यायची असेल तर ही माहिती उपयुक्त ठरू शकते.
अमूल फ्रँचायझीसाठी किती गुंतवणूक आवश्यक?
तुम्हाला अमूलची फ्रँचाइजी (AMUL Franchise Business) घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. यासाठी तुम्हाला प्रथम अमूल डेअरीशी संपर्क साधावा लागेल. त्यानंतर तुम्ही आउटलेट सुरू करू शकता. सर्वात आधी तुम्हाला आउटलेटसाठी चांगली जागा शोधावी लागेल. जेणेकरून तुमच्याकडे ग्राहकांचा ओढा कायम राहिल. ही जागा 100 चौरस फूट असावी. यानंतर तुम्हाला 25,000 रुपये सिक्युरिटी मनी म्हणून भरावे लागतील. यानंतर तुम्हाला उत्पादनासाठी पैसे द्यावी लागतील. याशिवाय दुकानाच्या नूतनीकरणासाठी, सजावटीसाठी काही रक्कम खर्च करावी लागू शकते.
किती होऊ शकते कमाई?
अमूल आपल्या दुकानदारांना प्रत्येक उत्पादनाच्या एमआरपीवर किंमतीवर कमिशन देते. तुम्ही दुधाची विक्रीची केल्यास किमान 10 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते. त्याचबरोबर आइस्क्रीमच्या विक्रीवर 20 टक्के कमिशन मिळते. याशिवाय हॉट चॉकलेट ड्रिंक्स, मिल्क शेक यांसारख्या अमूलच्या विविध उत्पादनांवर 50 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळू शकते. अमूलच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणांवर विक्री करून तुम्हाला दरमहा एक लाख रुपयांपर्यंत कमिशन मिळू शकते.
अमूल फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा?
अमूलच्या फ्रँचायझीसाठी तुम्हाला http://amul.com/m/amul scooping parlours या ठिकाणी क्लिक करून अधिक माहिती मिळू शकते.
अमूलशिवाय इतरही डेअर कंपन्यांच्या फ्रँचायझी तुम्हाला मिळू शकतात. यामध्ये मदर डेअरी, वारणा, महानंद, आदी डेअरी कंपन्यांच्या उत्पादनांची फ्रँचायझी तुम्हाला मिळू शकतात. त्यासाठी संबंधित डेअरी कंपनीच्या संकेतस्थळावर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.