(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paras Defence IPO : पारस डिफेन्स शेअर्समध्ये GPM लिस्टिंगआधी इश्यू प्राईजमध्ये 143 टक्क्यांनी वाढ
Paras Defence कंपनी आयपीओमधून 179.77 कोटी रुपये उभारत आहे. कंपनीने आधीच गुंतवणूकदारांकडून 51.23 कोटी रुपये गोळा केले आहेत.
Paras Defence IPO : प्रायव्हेट डिफेन्स आणि स्पेस इंजिनीअरिंग उत्पादनांची निर्मिती करणारी आणि सोलुशन्स देणारी कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग पुढील आठवड्यात 1 ऑक्टोबर रोजी होऊ शकते. लिस्टिंगच्या आधी कंपनीच्या शेअर्सच्या GMP (ग्रे मार्केट प्रीमियम) मध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
ग्रे मार्केटमध्ये, पारस डिफेन्सचे अनलिस्टेड शेअर्स जीएमपी इश्यू किमतीपेक्षा 405-425 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या इश्यूमध्ये 175 रुपयांचा अप्पर प्राइस बँड आहे. त्यानुसार, पारस डिफेन्सचे अनलिस्टेड शेअर्स 600 रुपयांवर (175+425) ट्रेड करत आहेत. म्हणजेच, कंपनी त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 143 टक्के जास्त ट्रेड करत आहे. जर तुम्ही GMP च्या आधारावर अंदाज लावला तर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग मजबूत होऊ शकते. कंपनीचा इश्यू 21 सप्टेंबरला उघडला आणि 23 सप्टेंबरला बंद झाला. त्याचा इश्यू 304.26 पटीने सबस्क्राइब झाला. 2007 नंतरची ही सर्वाधिक सब्सक्राईब आहे.
कंपनीच्या 71.40 लाख शेअर्सच्या बदल्यात 217.26 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली आहे. कंपनीच्या 175 रुपयांच्या अप्पर प्राइस बँडनुसार 38,000 कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी रिझर्व्ह हिस्स्यात 112.81 पट बोली लावली आहे. तर नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांनी (NIIs किंवा HNIs) त्यांच्या वाट्याला 927.70 पट बोली लावली आहे. पात्र क्वॉलिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी (क्यूआयबी) रिझर्व्ह भाग 169.65 वेळा सबस्क्राइब झाला आहे.
Multibagger Stock : गुंतवणूकदारांची लॉटरी! 'या' शेअर्समधून गुंतवणूकदारांचे पैसै महिनाभरात दुप्पट
कंपनी आयपीओमधून 179.77 कोटी रुपये उभारत आहे. कंपनीने आधीच गुंतवणूकदारांकडून 51.23 कोटी रुपये गोळा केले आहेत. कंपनीच्या शेअर्सचे वाटप 28 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Multibagger Stock : एक महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
कंपनीचा व्यवसाय
पारस डिफेन्स आणि स्पेस टेक्नॉलॉजीज डिफेन्स आणि स्पेस ऑप्टिक्स, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स प्रोटेक्शन सोल्यूशन्स आणि हेवी इंजिनिअरिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी आयपीओमधून मिळालेल्या निधीचा वापर यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या खरेदीसाठी करेल, त्याशिवाय कार्यरत भांडवलाची आवश्यकता पूर्ण करेल. या व्यतिरिक्त, निधीचा एक भाग कंपनी कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरेल.