एक्स्प्लोर

Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती पण...'; स्टार प्रवाहवरची अभिनेत्री झळकणार झी मराठीवरच्या नव्या मालिकेत

Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: 'सनई चौघडे' मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. 'तेजस्विनी खानोलकर' हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

Star Pravah Actress Entry In Zee Marathi Sanai Choughade Serial: सध्या टीआरपीचं (TRP) गणित बसवण्यासाठी आणि टीआरपीचा सर्वोच्च आकडा गाठण्यासाठी अनेक टीव्ही चॅनल्सनी (TV Channels) आता नव्या मालिकांचा घाट घातला आहे. अशीच एक नवी मालिका 'सनई चौघडे' झी मराठीवर येत आहे. या मालिकेत स्टार प्रवाहवरच्या एका दमदार अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे, अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar). 

'सनई चौघडे' मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. 'तेजस्विनी खानोलकर' हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदितीनं  मनमोकळ्या गप्पा मारल्या. "मी सनई चौघडे मालिकेत तेजस्विनी  खानोलकर ची व्यक्तीरेखा साकारतेय. नाव जस भारदस्त आहे, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. माझ्या सुदैवानं मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पुढए बोलताना अदिती सारंगधर म्हणाली की, "तेजस्विनीच्या मनात बरेच वर्षांपासून अनेक गोष्टी आहेत. तिनं खूप सहन केलेलं आहे, खूप काही भोगलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टीनं तिच्या मनावर परिणाम केलेला आहे. दिसायला जे जसं दिसतं ते तसं मुळात नसतं, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. ती आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे, आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आहे. झी मराठीवर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका केली आहे, पण आता पहिल्यांदा आता आईची भूमिका करणार आहे. मला झी मराठीने नेहमीच अशा सशक्त व्यक्तीरेखा दिलेल्या आहेत.  या भूमिकेसाठी माझी  निवड कशी  झाली हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे, कारण आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरु आहेत, बऱ्याच नाटकांचं वाचन चालू आहे, मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती."  

"तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःच काही म्हणणं आहे, तिच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत. खर सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, हल्ली टेलिव्हिजन मध्येही चांगले बदल घडून येत आहेत. म्ह्णून मी ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत, हि भूमिका स्वीकारली. अधिक सांगायच झालं तर राजू सावंत डायरेक्टर -प्रोड्युसर ह्यांच्या सोबत मला मनापासून काम करायचं होत. मला असं वाटत कि चांगल्या कलाकाराच्या वाट्याला चांगले दिग्दर्शक मिळणं आणि चांगल्या दिगदर्शकाला चांगले कलाकार मिळणं ही भाग्याची गोष्ट असते.", असं अदिती सारंगधर म्हणाली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sameer Gawde (@sameer_gawde_photography)

"आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे, हे सांगायचे झाले तर 'वादळवाट' मधली रमा चौधरी, 'लक्ष' मधली सलोनी देशमुख 'हम बने तुम बने' मधली तुलीका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधली मालविका, आणि आता  'सनई चौघडे' मधली तेजस्विनी प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात प्रत्येक भूमिकेची काहीतरी खास वेगळेपण असतं, दिसण्यामध्ये वागण्यामध्ये वावरण्यामध्ये.  मी अनेक मालिका केलेल्या आहेत तर मी नक्की म्हणणे लेखका पासून प्रत्येकानेच माझ्या भूमिकेतलं वेगळे पण जपलेलं आहे. आणि त्याच खास वेगळेपणासोबत प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी मी माझ्या परीने खुप प्रयत्न केलेला आहे...", असं अदिती म्हणाली. 

पुढे बोलताना अदिती सारंगधर म्हणाली की, "सहकलाकारांशी मैत्री म्हणजे मेघनाला मी पूर्वी पासून ओळखते त्यामुळे ती तर आहेच माझी खास, तसंच मी मनस्वी जी प्रोड्युसर आहे ती फार गोड मुलगी आहे तिला ओळखते. तसच बॅक स्टेज काम करणाऱ्यांशी माझं चांगल आहे त्यांना मी ओळखते, सर्व युनिट मधल्याना मी ओळखते त्यामुळे मला थोडं सुखद वाटल कि माझ्या लोकांमध्येच मी काम करणार आहे. आणि मला असं वाटत कि सहकालाकारांशी काम करता करता मैत्री होतेच, पण कलाकारांनी आपल्या युनिटला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. काम करता करता कलाकारांची मैत्री होऊन जाते, पण युनिटचा आनंद ही तेवढा महत्वाचा असतो.  मला युनिट सोबत वेळ घालवायला जेवायला बसायला फार आवडत. तसंच नवीन कलाकारांसोबत काम करताना नव्या ऊर्जेत काम करायला मला खुप आवडत ती नवीन ऊर्जा मला मिळते ती ऊर्जा आमच्या टीम मध्ये आहे..."

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget