एक्स्प्लोर

Multibagger Stock : गुंतवणूकदारांची लॉटरी! 'या' शेअर्समधून गुंतवणूकदारांचे पैसै महिनाभरात दुप्पट

किमान 44 स्टॉक असे आहेत जे एका महिन्यात दुप्पटपेक्षा जास्त वाढले. म्हणजे बँकेत पैसे डबल होण्यासाठी साधारण 12-15 वर्ष लागतात. मात्र काही स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट झाले आहेत.

Multibagger Stock : गेल्या एका महिन्यात बीएसई सेन्सेक्स 7 टक्क्यांहून अधिक वाढल्याने बाजार तेजीत राहिला आहे. बीएसई रियल्टी इंडेक्स, बीएसई टेलिकॉम इंडेक्स, बीएसई एनर्जी इंडेक्स आणि बीएसई कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्सचा ग्राफ या कालावधीत वर  होता. बीएसई रियल्टी इंडेक्स टॉप मंथली सेक्टोरल गेनर राहिला. गेल्या एका महिन्यात अनेक शेअर्सनी बीएसई सेन्सेक्सवर चांगली कामगिरी केली. किमान 44 स्टॉक असे आहेत जे एका महिन्यात दुप्पटपेक्षा जास्त वाढले. म्हणजे बँकेत पैसे डबल होण्यासाठी साधारण 12-15 वर्ष लागतात. मात्र काही स्टॉक्समुळे गुंतवणूकदारांचे पैसे महिनाभरात दुप्पट झाले आहेत. यातील सर्वाधिक वाढलेले 10 स्टॉक कोणते याबद्दल माहिती घेऊयात. 

1. बीपीएल लिमिटेड (BPL Ltd) इलेक्ट्रिकल सेक्टरचा हा स्टॉक एका महिन्यात 175.03 टक्क्यांनी वधारला आहे. या स्टॉकची 27 ऑगस्ट रोजी किंमत 35.85 रुपये होती जी 62.75 रुपयांनी वाढून 98.60 रुपये झाली आहे. 
 
2. प्लॅस्टिक प्रॉडक्ट्स सेक्टरमधील गोपाला पॉलीप्लास्ट लिमिटेडचा (Gopala Polyplast Ltd) स्टॉक एका महिन्यात 152.42 टक्क्यांनी वाढला आहे. या स्टॉकची किंमत 27 ऑगस्ट रोजी 233.70 रुपये होती. जी 356.20 रुपयांनी वाढून 589.90 रुपयांपर्यंत आली आहे.

3. आयटी स्टॉक कॉन्टिनेंटल केमिकल्स लिमिटेडमध्ये (Continental Chemicals Ltd) एका महिन्यात 152.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 27 ऑगस्ट रोजी 136.10 रुपयांना होता. जो महिनाभरात 207.15 रुपयांना वाढून 343.25 रुपयांवर आला आहे. 

4. फायनान्स स्टॉक सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेडनेही (Sindhu Trade Links Ltd) चांगली कामगिरी केली. या स्टॉकमध्ये एका महिन्यात 152.05 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 27 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 111.05 रुपये होती. जी महिनाभरात 168.85 रुपयांनी वाढून 279.90 रुपयांवर आली आहे. 

5. जेआईटीएफ इंफ्रालॉजिस्टिक्स लिमिटेड (JITF Infralogistics Ltd) स्टॉकमध्ये गेल्या एका महिन्यात 151.47 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 64.60 रुपये होती. जी 97.85 रुपयांनी वाढून 162.45 रुपयांवर आली आहे.   

6. फायनान्स स्टॉक TTI Enterprise Ltd मध्ये 151.55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या स्टॉकची किंमत 11.29 रुपये होती. जी महिनाभरात 17.11 रुपयांनी वाढून 28.40 रुपयांवर गेली आहे. 

7. गेल्या एक महिन्यात आदिनाथ टेक्सटाइल्स लि.चा (Adinath Textiles Ltd) शेअर 150.64 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत 35.09 रुपये होती. जी 52.86 रुपयांनी वाढून 87.95 रुपायंवर पोहोचली आहे. 

8. चेन्नई फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडने (Chennai Ferrous Industries Ltd) गेल्या एका महिन्यात 150.60 टक्क्यांनी वाढ केली आहे. या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी 29.41 रुपये होती. जी महिनाभरात 44.29 रुपयांनी वाढून 73.70 रुपायंवर पोहोचली आहे.

9. बॉम्बे वायर रोप्स लिमिटेडने (Bombay Wire Ropes Ltd) गेल्या एका महिन्यात 150.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या स्टॉकची किंमत गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी 24.51 रुपये होती. जी 36.79 रुपयांनी वाढून 61.30 रुपयांवर पोहोचली आहे. 

10. एशियन पेट्रोप्रोडक्ट्स अँड एक्स्पोर्ट्स लिमिटेडचा (Asian Petroproducts & Exports Ltd) शेअर गेल्या एका महिन्यात 149.88 टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरची किंमत गेल्या महिन्यात 27 ऑगस्ट रोजी 20.91 रुपये होती. जी 31.34 रुपयांनी वाढून 52.25 रुपयांवर आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget