Multibagger Stock : एक महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट; तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?
काउंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टमच्या (CUAS) पुरवठ्यासाठी झेन टेक्नोलॉजीस लिमिटेड कंपनीला (Zen Technologies Limited) भारतीय वायुसेनेकडून (IAF) 155 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर हा स्टॉक वाढला आहे.
Share Market News : शेअर मार्केटमध्ये चांगला स्टॉक निवडण्याचं स्कील असेल तर कमी वेळेत जास्त पैसे मिळवणे सहज शक्य आहे. बँकेत पैस दुप्पट व्हायला किमान 10 वर्षतरी लागतात, मात्र शेअर मार्केटमध्ये असे काही स्टॉक्समध्ये जे कमी वेळेत पैसे दुप्पट करण्याची क्षमता ठेवतात. असाच एक शेअर आहे ज्या शेअरमुळे पैसे महिनाभरात दुप्पट झाले आहेत. झेन टेक्नोलॉजीस लिमिटेडचे (Zen Technologies Limited) शेअर गेल्या महिनाभरात 85 रुपयांवरुन 9 सप्टेंबर रोजी 205.10 रुपयांवर पोहोचला आहे. या स्टॉकमध्ये महिनाभरात जवळपास 140 टक्क्याहून अधिकची वाढ झाली आहे.
काउंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट सिस्टमच्या (CUAS) पुरवठ्यासाठी कंपनीला भारतीय वायुसेनेकडून (IAF) 155 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर हा स्टॉक वाढला आहे. ही ऑर्डर 12 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
गुंतवणुकदारांना कमाईची मोठी संधी, देशातील सर्वात जुन्या खाजगी बँकेचा IPO येणार
कंपनीने म्हटलं की, अँटी ड्रोन स्पेसमध्ये झेन टेक्नॉलॉजीजची ही पहिली महत्त्वपूर्ण ऑर्डर आहे आणि भविष्यात अतिरिक्त ऑर्डर मिळवण्याचा कंपनीला विश्वास आहे. गुरुवारी हा शेअर बीएसईवर 205.10 रुपयांवर बंद झाला. सध्या हा स्टॉक सतत वाढत आहे.
Ways to Save Money | तज्ञांच्या मते पैसे वाचवण्याचे जिनियस मार्ग!
1,552.83 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह, शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा जास्त ट्रेड करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून स्टॉक 117 टक्क्यांनी वाढला आणि गेल्या 12 महिन्यांत 186 टक्क्यांनी वाढला आहे.
01 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीची ऑर्डर बुक 402.6 कोटी रुपये होती, तर 30 जून 2021 रोजीची ऑर्डर बुक 191.6 कोटी रुपये होती. MarketsMojo नुसार, कंपनीचे कर्ज ते इक्विटी रेशो (सरासरी) -0.09 पट कमी आहे. मात्र कंपनीने गेल्या सलग 5 क्वार्टर्ससाठी निगेटिव्ह रिझल्ट घोषित केले आहेत.