एक्स्प्लोर

PAN Card : अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड बनवायचे आहे! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PAN Card : आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. अल्पवयीन मुलांचेही पॅन कार्ड बनवले जाऊ शकते. परंतु, अल्पवयीन मुलाला पॅन कार्डसाठी थेट अर्ज करता येत नाही तर त्याच्या पालकांनीच यासाठी अर्ज करावा लागतो.

PAN Card : आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही आज अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. ओळख पटवण्यासाठी आधार कार्डला अधिकृत मान्यता आहे तर आयटीआर  भरण्यासाठी पॅन कार्ड हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. हेच पॅन कार्ड अल्पवयीन मुलांचेही बनवले जाऊ शकते. अनेक वेळा परदेशात जाण्यासाठी किंवा शाळेत गरजेच्या वेळी पॅन कार्डची आवश्यकता असते. परंतु, महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही अल्पवयीन मुलाला पॅन कार्डसाठी थेट अर्ज करता येत नाही तर त्याच्या पालकांनीच यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी संबंधित मुलाच्या आई-वडिलांच्या काही कागदपत्रांची आवश्यकता असते. 

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे 
अल्पवयीन मुलाच्या पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर संबंधित मुलाच्या आई आणि वडिलांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. यासोबतच अर्जदाराचा पत्ता आणि त्याच्या ओळखीचा पुरावा गरजेचा आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओखळपत्र, यापैकी कोणतेही एक कागदपत्र आवश्यक आहे. रहिवाशी प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड, घर नोंदणी दस्तऐवज, मूळ रहिवासी प्रमाणपत्राची प्रत किंवा पोस्ट ऑफिस पासबुकपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे असल्यानंतर पॅन कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. 

असा करा पॅन कार्डसाठी अर्ज!
प्रथम NSDL च्या साईटवर जावा. त्यानंतर ज्या अल्पवयीन मुलाचे पॅन कार्ड काढायचे आहे, त्याचा सेक्शन निवडा. सेक्शन निवडण्यासाठी मुलाची सर्व माहिती भरा. त्यामध्ये अल्पवयीन मुलाच्या वयाचा दाखला आणि पालकांच्या फोटोसह इतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आई आणि वडिलांची डिजिटल स्वाक्षरीही अपलोड करावी लागेल. महत्वाची बाब म्हणजे पॅन कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला 107 रूपये फी भरावी लागेल. ही फी डिजिटल स्वरूपात भरता येईल. फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर मेलवर कंफर्मेशन येईल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रिसीट नंबर मिळेल, तो सांभाळून ठेवायचा आहे. कारण या नंबरवरूनच अर्जाचा स्टेटस पाहता येणार आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मुलाचे पॅन कार्ड पोहोच होईल. 

महत्वाच्या बातम्या

PAN Card : काय म्हणता तुमच्याकडे पॅन कार्ड नाही? जाणून घ्या पॅन कार्डचे फायदे

PAN Link To LIC Policy :  तुमचे पॅन कार्ड 'असे' करा तुमच्या एलआयसी पॉलिसीसोबत लिंक

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget