एक्स्प्लोर

Old Tax Regime : मोठी बातमी, जुनी कररचना येत्या एक दोन वर्षात संपेल, वित्त सचिवांचं मोठं वक्तव्य, नव्या आयकर कायद्यावर म्हणाले...

Old Tax Regime : जुनी कररचना येत्या एक दोन वर्षात संपेल, असं वक्तव्य वित्त व महसूल विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटलं.

Old Tax Regime  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गाला दिलासा देणारी घोषणा केली. नव्या कररचनेचे (New Tax Regime) स्लॅब बदलण्यात आले. करमुक्त उत्पन्न  नव्या कर रचनेत तीन लाखांवरुन चार लाखांवर नेण्यात आली. प्राप्तिकराच्या टक्केवारीत देखील बदल करण्यात आले. याशिवाय 12 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत प्राप्तिकरदात्यांना करसवलत देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात जुन्या कररचनेसंदर्भात (Old Tax Regime) कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. वित्त व महसूल विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी जुन्या कररचनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. जुनी कररचना येत्या एक दोन वर्षात संपेल, असं ते म्हणाले. 

तुहिन कांत पांडेय जुन्या कररचनेबाबत काय म्हणाले? 

तुहिन कांत पांडेय म्हणाले नव्या कररचनेत करसवलत 12 लाख रुपयांपर्यंत दिली जाणार आहे. त्यामुळं जुनी कररचना आपोआप संपेल, अशी शक्यता आहे. आम्ही नवी करव्यवस्था आणली आहे, याचा उद्देश हा आहे की  तुम्ही करातून सूट मिळवण्याबाबत कायम विचार करण्यापूर्वी आपल्या गरजेनुसार गुंतवणुकीचा विचार करावा. 

जुनी कररचना टप्प्या टप्प्यानं संपेल का असं विचारलं असता त्यांनी अर्थसंकल्पात जुन्या कररचनेसंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामध्ये सूट आणि स्लॅबचे दर वेगवेगळे आहेत.  मात्र, माझ्या मते जुनी कररचना आपोआप संपुष्टात येईल. 2025-26 च्या अर्थसंकल्पात एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यामुळं सर्व करदाते नव्या कररचनेत येतील. जर, तुम्हाला 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत हवी असेल तर तुम्ही काय कराल, असं तुहिन कांत पांडेय म्हणाले. 

सर्व लोक नव्या कररचनेत आल्यानंतर जुनी करव्यवस्था आपोआप संपुष्टात येईल. याशिवाय नवी कररचना डिफॉल्ट आहे. जर तुम्ही जुनी कररचना निवडली नाही तर नवी कररचना आपोआप निवडली जाते. 

तुहिन कांत पांडेय यांनी नवा प्राप्तिकर कायदा छोटा आणि सरळ असेल. समजून घेण्यासाठी सोपा असेल. जुन्या झालेल्या गोष्टी हटवल्या जातील. सर्व गोष्टी एका ठिकाणी आणल्या जातील, यामुळे कायदेशीवरा वाद कमी होतील, असं तुहिन कांत पांडेय म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 75 टक्के लोकांनी नव्या कररचनेचा पर्याय स्वीकारल्याची माहिती दिली होती. जुन्या कररचनेत 25 टक्के करदाते आहेत. ते लवकरच नव्या कररचनेत येतील, अशी आशा सीतारामन यांनी व्यक्त केली होती. 

इतर बातम्या: 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget