Share Market News : शेअर बाजारातील व्यवहार घसरणीसह स्थिरावले; गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटींचे नुकसान
Share Market News : शेअर बाजारातील व्यवहार आज घसरणीसह स्थिरावले. निफ्टी 18 हजार अंकांखाली स्थिरावला.
Share Market News : आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील व्यवहार घसरणीसह बंद झाले. सकाळच्या सत्रात जागतिक पातळीवरील कमकुवत संकेतामुळे बाजारातील व्यवहार घसरणीसह सुरू झाले होते. दिवसभरातील व्यवहारात अस्थिरता दिसून आली. आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 316.94 अंकांच्या घसरणीसह 61,002.57 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 91.65 अंकांच्या घसरणीसह 17,944.20 अंकांवर स्थिरावला.
सेक्टर इंडेक्समध्ये काय स्थिती?
आज दिवसभरातील व्यवहारात एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तर, बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी सेक्टरमधील शेअर घसरणीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर दरातही घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 17 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, 33 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
इंडेक्स | कोणत्या अंकांवर स्थिरावला | दिवसातील उच्चांक | दिवसातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 61,029.52 | 61,302.72 | 60,810.67 | -0.47% |
BSE SmallCap | 28,045.25 | 28,187.59 | 28,018.53 | -0.24% |
India VIX | 13.09 | 13.52 | 10.80 | 0.02 |
NIFTY Midcap 100 | 30,642.05 | 30,863.15 | 30,591.80 | -0.79% |
NIFTY Smallcap 100 | 9,417.55 | 9,496.25 | 9,402.55 | -0.57% |
NIfty smallcap 50 | 4,261.40 | 4,298.55 | 4,257.05 | -0.78% |
Nifty 100 | 17,721.05 | 17,808.55 | 17,666.30 | -0.53% |
Nifty 200 | 9,275.45 | 9,321.80 | 9,249.40 | -0.56% |
Nifty 50 | 17,944.20 | 18,034.25 | 17,884.60 | -0.51% |
आजच्या दिवसभरातील व्यवहारात लार्सनच्या शेअर दरात 2.18 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.77 टक्के, एशियन पेंट्स 1.01 टक्के, एनटीपीसी 0.51 टक्के, रिलायन्स 0.42 टक्के, टाटा स्टील 0.27 टक्के आणि आयटीसी 0.21 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. तर इंडसइंड बँक 3.13 टक्के, नेस्ले 3.12 टक्के, महिंद्रा 1.73 टक्के, एसबीआय 1.70 टक्के, टीसीएस 1.53 टक्के, कोटक महिंद्रा 1.52 टक्के, एचसीएल टेक 1.49 टक्के, सन फार्मा 1.26 टक्के, एएक्सआय बँक 1.26 टक्के. , इन्फोसिस 1.15 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात, आयटी आणि पीएसयू बँक निर्देशांकात यावेळी सर्वात मोठी घसरण दिसून आली. शुक्रवारी, भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. सकाळच्या व्यवहाराच्या सुरूवातीस, बीएसई सेन्सेक्स 270.75 अंकांनी घसरून 61,048.76 वर उघडला, तर निफ्टी सुमारे 0.34% घसरून 17,975 वर उघडला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट
आजच्या व्यवहारादरम्यान शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 266.90 लाख कोटी रुपयांवर घसरले. गुरुवारी मार्केट कॅप 268.23 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.