ITR Form : ITR साठी आयकर विभागाकडून नवीन फॉर्म अधिसूचित, जाणून घ्या काय असेल खास
ITR Form : केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये, करदात्यांना आयटीआर दाखल केल्यानंतर दोन वर्षांच्या आत 'अपडेट' करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ITR Form : प्राप्तिकर विभागाने अपडेटेड इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी नवीन फॉर्म अधिसूचित केला आहे. नवीन फॉर्म (RTR-U) करदात्यांना 2019-20 आणि 2020-21 या आर्थिक वर्षांसाठी अपडेटेड (updated) आयकर रिटर्न भरण्यासाठी उपलब्ध असेल. जाणून घ्या सविस्तर
'ही' माहिती देणे आवश्यक
आयटीआर-यू दाखल करणाऱ्या करदात्यांना उत्पन्नाचे अपडेट करण्यासाठी कारणे द्यावी लागतील. त्यांना आधी रिटर्न का भरले नाही? उत्पन्नाची योग्य माहिती का दिली गेली नाही? याचे कारण स्पष्ट करावे लागेल. हा फॉर्म संबंधित मूल्यांकन वर्षाच्या समाप्तीपासून दोन वर्षांच्या आत दाखल करता येणार आहे.
प्रथम कर भरणे आवश्यक
केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये, करदात्यांना आयटीआर दाखल केल्यानंतर दोन वर्षांच्या आत 'अपडेट' करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या परवानगीपूर्वी कर भरणे आवश्यक आहे. आयटीआरमध्ये झालेली चूक किंवा कोणतीही माहिती गहाळ झाली असल्यास ती सुधारण्याची संधी देणे हा याचा उद्देश आहे. करदात्याला प्रत्येक मूल्यांकन वर्षात फक्त एकदाच अपडेटेड रिटर्न दाखल करण्याची परवानगी असेल.
जाणून घ्या तज्ज्ञांचे म्हणणे
नांगिया आणि कंपनी LLP चे भागीदार शैलेश कुमार एबीपी लाईव्हला माहिती देत म्हणाले की, करदात्यासाठी संबंधित माहिती सहज भरता यावी. यासाठी या फॉर्ममध्ये गोष्टी 'अचूक' ठेवण्यात आल्या आहेत. कुमार म्हणाले, "याशिवाय, केवळ करासाठी सादर केलेल्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये, नियमित आयटीआर फॉर्मप्रमाणे वेगवेगळ्या हेडमध्ये उत्पन्नाचा तपशील देणे आवश्यक आहे. अपडेटेड आयकर रिटर्न भरण्याचे कारणही फॉर्ममध्येच द्यावे लागेल.
थकीत कर आणि व्याजाच्या 25% अतिरिक्त रक्कम
माहितीनुसार, 2019-20 साठी हा फॉर्म भरू इच्छिणाऱ्या करदात्यांना थकबाकीदार कर तसेच व्याजासह अतिरिक्त 50 टक्के कर आणि व्याज भरावे लागेल, ज्या करदात्यांना 2020-21 साठी हा फॉर्म भरायचा आहे. त्यांना थकीत कर आणि व्याजाच्या 25% अतिरिक्त रक्कम भरावी लागेल.