एक्स्प्लोर

Mumbai : मुंबईत एप्रिल महिन्यात 11 हजारांपेक्षा जास्त विक्रमी घरं विकली! सरकारच्या महसुलात तब्बल 738 कोटींची वाढ

Mumbai property registrations : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. परंतु, सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्रावर मात्र कोरोनाचा जास्त परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळाले आहे.

Mumbai property registrations : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले. आता जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गेल्या काही काळापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. परंतु, सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या बांधकाम क्षेत्रावर मात्र कोरोनाचा जास्त परिणाम झाला नसल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण मुंबईत एप्रिल 2022 मध्ये 11,744 घरांची मालमत्ता विक्री नोंदणी झाली. त्यातून सरकारला मिळणाऱ्या महसुलात तब्बल 738 कोटींपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती नाईट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट कन्सल्टन्सीने दिली आहे. 

बांधकाम क्षेत्रातील नाईट फ्रँक इंडिया या कंपनीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये एप्रिल 2022 मध्ये 11,744 युनिट्सची मालमत्ता विक्री नोंदणी झाली आहे. आणि हा दशकातील सर्वोत्तम एप्रिल महिना ठरला, त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये 10,136 युनिट्सची विक्रमी नोंदणी झाली. दोन्ही विक्रमी उच्च मार्च महिन्याच्या आधी होते, जिथे मार्च 2021 मध्ये मुद्रांक शुल्क माफीची समाप्ती (3% मुद्रांक शुल्क लागू दर) झाल्याची नोंद झाली, तर मार्च 2022 मध्ये जास्त विक्री झाली कारण अतिरिक्त 1% लागू होण्यापूर्वीचा शेवटचा महिना होता. 

एप्रिल 2022 मध्ये नोंदणी करताना मार्च 2022 मध्ये फाइल करून ग्राहकांनी त्यांची खरेदी वाढवली, त्यांच्या डीलवर प्रभावीपणे 1% मेट्रो उपकर बचत केली. एप्रिल 2022 मध्ये निष्पादित केलेल्या मालमत्ता नोंदणीपैकी 82% नोंदणी मार्च-2022 मध्ये 5% च्या प्रभावी मुद्रांक शुल्क दराने दाखल करण्यात आली. एप्रिल 2022 मध्ये नोंदणीकृत 17% मालमत्ता एप्रिल 2022 मध्ये 6% च्या प्रभावी मुद्रांक शुल्क दरासह भरल्या गेल्या.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये 1 मे 2022 पासून लागू होणार्‍या 1 टक्के मेट्रो उपकरामुळे एप्रिल 2022 काहीशी घर विक्रीला काहीशी गती मिळाली.  

नोंदणीसाठी दैनंदिन सरासरी : 

नाइट फ्रँक इंडिया कंपनीच्या आकडेवारीनुसार, मागच्या म्हणजे 2021 या वर्षात जानेवारी महिन्यात 10 हजार 412 मालमत्तांची नोंदणी झाली होती. मागच्या वर्षी फेब्रुवारी मध्ये 10 हजार 172, मार्च मध्ये 17 हजार 728, एप्रिलमध्ये 10 हजार 136 मे महिन्यात 5 हजार 366, जूनमध्ये 7 हजार 856, जुलैमध्ये 9 हजार 822, ऑगस्ट मध्ये 6 हजार 784, सप्टेंबरमध्ये 7 हजार 804, ऑक्टोंबर महिन्यात 8 हजार 576, नोव्हेंबर मध्ये 7 हजार 582 आणि डिसेंबर 2021 मध्ये 9 हजार 320 मालमत्तांची नोंदणी झाली होती. 

नाइट फ्रँक इंडिया कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशीर बैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर व्यवसाय वाढत आहे. ही वाढ थोड्या प्रमाणात असली तरी सकारात्मक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बाजारात अजून चांगली स्थिती पाहायला मिळेल, असे शिशीर बैजल यांनी सांगितले.   

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget