1 लाखाचे झाले 76 लाख, चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स; 'ही' कंपनी तुम्हाला करू शकते श्रीमंत?
सध्या भांडवली बाजारात या शेअरची चांगलीच चर्चा आहे. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 20 टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.
![1 लाखाचे झाले 76 लाख, चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स; 'ही' कंपनी तुम्हाला करू शकते श्रीमंत? multibagger company Dhruva Capital Services share price today know detailed analysis in marathi 1 लाखाचे झाले 76 लाख, चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स; 'ही' कंपनी तुम्हाला करू शकते श्रीमंत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/25/adb941e33603538258564f6f4ffb36c51724569068584988_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Multibagger Share: शेअर बाजारात बऱ्याच कंपन्या असतात ज्या आपल्या गुंतवणूकारांना दामदार रिटर्न्स देत असतात. फक्त हे शेअर्स शोधून त्यात गुंतवणूक करण्याचे कष्ट घ्यावे लागतात. गुंतवणूक करण्याआधी संबंधित शेअरची आर्थिक स्थिती, कंपनी काम करत असलेले क्षेत्र, या कंपनीकडील कामाचा अभ्यास केल्यास, गुंतवणूक करायची की नाही? हे ठरवता येते. दरम्यान, सध्या मल्टिबॅगर ठरलेल्या अशाच एका कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे. या कंपनीने चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. या शेअरची किंमत अवघ्या एका वर्षात तब्बल 503 टक्क्यांनी वाढली आहे.
एक लाख रुपयांचे झाले अशते 76.30 लाख रुपये
मल्टीबॅगर ठरलेल्या या शेअरचे नाव ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस असे आहे. या कंपनीकडून वैयक्तिक स्वरुपासाठी तसेच उद्योगासाठी कर्ज दिले जाते. चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरच्या मूल्य अवघे 5.4 रुपये होते. आता हाच शेअर शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी मुंबई शेअर बाजारावर तब्बल 411.85 रुपयांवर पोहोचला आहे. समजा चार वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या कंपनीत 10000 गुंतवले असते तर आज या पैशांचे मूल्य आज 7.63 लाख रुपये असते. तुम्ही चार वर्षांपूर्वी या कंपनीत 50000 रुपये गुंतवले असते तर आजत तुमच्याकडे 38.15 लाख रुपये असते. तुम्ही चार वर्षांपूर्वी या कंपनीत 1 लाख गुंतवले असते तर आज त्याच एक लाख रुपयांचे तब्बल 76.30 लाख रुपये झाले असते.
5 दिवसांत शेअरमध्ये 20 टक्क्यांनी वाढ
Dhruva Capital Services या कंपनीचे भागभांडवल 167 कोटी रुपये आहे. 2024 साली आतापर्यंत हा शेअर 95 टक्क्यांनी वाढलेला आहे. या कंपनीची जून 2024 पर्यंत 54.18 टक्के मालकी ही प्रमोटर्सकडे होती. पाच दिवसांच्या सत्रात या शेअरचे मूल्य 20 टक्क्यांनी वाढले आहे.
ध्रुव कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीचे एप्रिल-जून 2024 या तिमाहीतील उत्पन्न 45.92 लाख रुपये राहिले. गेल्या वर्षी याच काळात हे उत्पन्न 17.19 लाख रुपये होते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
UPS आणि NPS म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर
मोठी बातमी! टेलिग्रामच्या संस्थापकाविरोधात मोठी कारवाई, विमातळावर पोलिसांकडून अटक
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)