Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी
Devenra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली असल्याने देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा उत्सव साजरा केला जातोय.
मुंबई : संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी अखेर आज (बुधवार) देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्या अनुषंगाने आता नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस (Devenra Fadnavis) हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री पदाची घोषणा होताच देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून मोठा उत्सव साजरा केला जातोय. 'क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में' असे म्हणत फडणवीस यांच्या घरासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून सूचक घोषणाजी ही केली जातेय.
देवेंद्र फडणवीस यांचा नाव भाजपचे कोर कमिटीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी निश्चित होताच नागपुरात त्यांच्या घरासमोर भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय. ढोल ताशाच्या निनादात कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच येतील असा आम्हाला विश्वास होता आणि आता हळूहळू एक एक टप्पा पार करून ती प्रक्रिया पार पडत असल्याचा आनंद असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
फडणवीसांचा चाहत्या चहावाल्याकडून सेलिब्रेशन
देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड होताच, या खुशीमध्ये नागपूर मधील फडणवीसांचा चाहता चहावाला गोपाल बावणकुळे ग्राहकांना फ्री मध्ये चहा वाटून नागपूरकरांचे तोंड गोड करत आहे. नागपूरकर देखील या आनंदाच्या क्षणी चहाचा आनंद घेत फडणवीसांच्या निवडीचे सेलिब्रेशन करतांना पाहायला मिळाले.
आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला जाणार
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीन वाजता सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यासाठी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे तिघेही राज्यपालांची भेट घेतील. त्यानंतर या भेटीत राज्यात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले जाईल. त्यानंतर सत्तास्थापनेची प्रक्रिया चालू होईल.
हे ही वाचा