Devendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोष
Devendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोष
Devendra Fadnavis Maharashtra CM मुंबई: संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अखेर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अनुमोदन देताना भाजपच्या आमदारांनी विविध विशेषणं वापरली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सगळ्यांचे मित्र, आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं. तर सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून चालणारे, शिवभक्त असं म्हणत देवेंद्र फडणवीसांचं पुढे नाव घेतलं. विधिमंडळात देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अनुमोदन देताना कोणी कोणती विशेषणं वापरली, पाहा...