14 जलद गस्ती नौकांची खरेदी होणार, संरक्षण मंत्रालयाचा माझगाव डॉक शिपबिल्डसोबत 1070 कोटींचा करार
संरक्षण मंत्रालयानं माझगाव डॉक शिपबिल्डर लि. (Mazgaon Dock Shipbuilder Ltd) सोबत 1070 कोटी रुपयांचा करार केला आहे. याद्वारे 14 जलद गस्ती नौका खरेदी करण्यात येणार आहेत.
Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलासाठी (Indian Coast Guard) 14 जलद गस्ती नौका खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी संरक्षण मंत्रालयानं माझगाव डॉक शिपबिल्डर लि. (Mazgaon Dock Shipbuilder Ltd) सोबत 1070 कोटी रुपयांचा करार केला आहे. या बहुउद्देशीय नौकांची रचना आणि विकास स्वदेशी असेल आणि माझगाव डॉक लि . द्वारे खरेदी (इंडियन-आयडीडीएम ) श्रेणी अंतर्गत त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. एकूण 63 महिन्यात या गस्ती नौका वितरित केल्या जाणार आहेत.
या गस्ती नौका विविध क्षमतांनी सुसज्ज असणार
भारतीय तटरक्षक दलासाठी 14 जलद गस्ती नौका खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने बुधुवारी ( 24 जानेवारी 2024 ) रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर लि., मुंबई सोबत करार केला आहे. कराराचे मूल्य 1070.47 कोटी रुपये आहे. या नौकांची रचना आणि विकास स्वदेशी असणार आहे. माझगांव डॉक लि . द्वारे खरेदी अंतर्गत त्यांची बांधणी करण्यात येणार आहे. या नौका 63 महिन्यांत वितरित केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विविध उच्च तंत्रज्ञान आणि प्रगत वैशिष्ट्ये आणि उपकरणे तैनात असलेल्या या गस्ती नौका बहुउद्देशीय ड्रोन, वायरलेस नियंत्रित रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट लाइफबॉय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता इत्यादींनी सुसज्ज असणार आहेत.
Ministry of Defence #MOD has signed a contract for the acquisition of 14 Fast Patrol Vessels (FPVs) with Mazagon Dock Shipbuilders Ltd (MDL), #Mumbai for @IndiaCoastGuard #ICG at the total project cost of Rs 1070 Cr today.@giridhararamane @MazagonDockLtd @makeinindia pic.twitter.com/WsOCgJWhXv
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) January 24, 2024
नौकांची नेमकी भूमिका काय?
नवीन युगाच्या बहुआयामी आव्हानांना समोरे जाण्यासाठी तसेच भारतीय तटरक्षक दलाला अधिक लवचिक आणि धारदार बनवण्यासाठी या नौका महत्वाची भूमिका बजावतील. या आधुनिक गस्ती नौका मत्स्योद्योग संरक्षण आणि देखरेख, नियंत्रण आणि पाळत, तस्करीविरोधी मोहिमा, उथळ पाण्यात शोध आणि बचाव कार्ये, संकटात सापडलेल्या जहाज आणि विमानांसाठी मदत करतील. तसेच टोइंग क्षमता, सागरी प्रदूषण निवारण मदत आणि देखरेख चाचेगिरी विरोधी मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. या गस्ती नौकांच्या खरेदीचा उद्देश भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढवणे आणि सागरी सुरक्षेकडे सरकारचे लक्ष केंद्रित करणे हा आहे.
या प्रकल्पामुळं देशात रोजगाराच्या संधी निर्माण होणार
आत्मनिर्भर भारतच्या धर्तीवर हा करार देशाच्या स्वदेशी जहाज बांधणीच्या क्षमतेला आणि सागरी आर्थिक घडामोडींना चालना देईल. तसेच सहाय्यक उद्योगांच्या विशेषत: एमएसएमई क्षेत्राच्या वाढीला बळ देईल. या प्रकल्पामुळं देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि कौशल्य विकास प्रभावीपणे होईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: