Sangli : कृष्णा नदीपात्रात रंगल्या भव्य होड्यांच्या शर्यती, थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी
Sangli News : मिरजमधील कृष्णा नदीच्या (krishna river) पात्रात भव्य होड्यांच्या शर्यती (boat race) पार पडल्या.
![Sangli : कृष्णा नदीपात्रात रंगल्या भव्य होड्यांच्या शर्यती, थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी Sangli News sangli boat race competition in krishna river in miraj Sangli : कृष्णा नदीपात्रात रंगल्या भव्य होड्यांच्या शर्यती, थरारक शर्यती पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/30/12c0ce81738e0af1b9d3bbe1a2fcf83f1690695722443339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमधील कृष्णा नदीच्या (krishna river) पात्रात भव्य होड्यांच्या शर्यती (boat race) पार पडल्या. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर व्हनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीनं आणि थरारक अशा पार पडलेल्या होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला
कृष्णा नदीमध्ये पार पडलेल्या या थरारक होडी शर्यतीमध्ये मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पावसाळा सुरु झाला की सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगत असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीने आणि थरारक अशा पार पडलेल्या होडीच्या शर्यती पाहण्यासाठी कृष्णा काठावर हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. नदी पात्रात तीन किलोमीटर अंतराच्या चार फेरी मारण्याच्या शर्यतीत मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने पहिला क्रमांक पटकावला तर समडोळी बोट क्लबने दुसरा आणि तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
दरवर्षी होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो
दरम्यान, होडी शर्यतीमध्ये विजेत्या संघांना सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार आणि इतर मान्यवरांच्या रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. केवळ पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्येच कृष्णेच्या पात्रात अशा होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो. सांगलीच्या कृष्ण नदीपात्रामध्ये होड्यांची शर्यत आयोजित करण्याची परंपरा आजही कायम आहे. पावसाळ्यात पाणी ओसरल्यानंतर होड्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात येतं. कोरोनाच्या काळात दोन वर्षे होड्यांच्या स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यानंतर मात्र, प्रत्येक वर्षी कृष्णा नदी होड्यांची स्पर्धा होते.
महत्त्वाच्या बातम्या:
Sangli News : कृ्ष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचा थरार, आयर्विन पुलाजवळ एक होडी उलटली अन्...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)