एक्स्प्लोर
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
Share Market : भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात सर्वाधिक रक्कम काढून घेतली आहे. यासाठी विविध कारणं असल्याचं देखील दिसून येतं.

विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले
1/5

विदेशी गुंतवणूकदारांकडून गेल्या चार वर्षांपासून जानेवारी महिन्यात भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. यंदा देखील भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी पैसे काढून घेतले आहेत.
2/5

अमेरिकेतील बदललेली राजकीय स्थिती, डॉलरचं मजबूत होणं, अमेरिकेत बॉण्ड यील्ड्समध्ये वाढ होणं, याशिवाय भारतीय शेअर बाजारातील कमजोर स्थिती यामुळं इक्विटीमधून विदेशी गुंतवणूकदारांनी 44396 कोटी रुपये काढून घेतले आहेत.
3/5

डिसेंबर महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 45446 कोटी रुपये काढून घेतले होते, त्या तुलनेत जानेवारी महिन्यात तिप्पट रक्कम काढून घेण्यात आली आहे. जागतिक आणि देशांतर्गत स्थिती पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेतले आहेत.
4/5

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर असल्यानं विदेशी गुंतवणूकदारांवर इक्विटी बाजारातून पैसे काढून घेण्याचा दबाव वाढल्याचं मॉर्निगस्टार इन्वेस्टमेंट अॅडव्हायजर्स इंडियाचे कार्यकारी संचालक हिमांशु श्रीवास्तव यांनी म्हटलं.
5/5

भारतीय इक्विटीजचं अधिक मूल्यांकन हे देखील एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगासंदर्भातील अनिश्चितता हे देखील एक कारण समोर आलं आहे. आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 17 जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार 44396 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2 जानेवारी या दिवशी विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले नव्हते. ((टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.))
Published at : 20 Jan 2025 06:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
विश्व
बातम्या
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
