5 पैशाची काडीपेटी आता 2 रुपयाला, जाणून घ्या काडीपेटीचा इतिहास
सध्याच्या या लाइटरच्या युगात काडी पेटीला (Matchbox) देखील मोठी मागणी आहे. काडी पेटी तयार करण्याचा व्यवसाय सध्या चांगला सुरु आहे. सध्या एका काडी पेटीची किंमत 2 रुपये आहे.
Matchbox History : सध्याच्या या लाइटरच्या युगात काडी पेटीला (Matchbox) देखील मोठी मागणी आहे. काडी पेटी तयार करण्याचा व्यवसाय सध्या चांगला सुरु आहे. सध्या एका काडी पेटीची किंमत 2 रुपये आहे. यापूर्वी 2007 मध्ये काडी पेटीची किंमत वाढली होती. त्यावेळी 50 पैशांच्या काडी पेटी 1 रुपयाला करण्यात आली. या किंमती वाढवण्याचा निर्णय शिवकाशी येथील ऑल इंडिया चेंबर ऑफ माचीसने घेतला आहे. आताही, बहुतेक ग्रामीण भागात लोक काडी पेटी वापरतात.
1895 साली भारतात काडी पेट्यांची निर्मिती सुरु झाली होती. काडी पेटीचा पहिला कारखाना हा अहमदाबाद आणि त्यानंतर कोलकाता येथे सुरु करण्यात आला होता. स्वीडनमधील मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं भारतात मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उघडली होती.
1. भारतात 1950 साली एका काडी पेटीची किंमत फक्त 5 पैसे होती. जी 1994 मध्ये 50 पैशांपर्यंत वाढली. त्यानंतर 2007 मध्ये किंमत 50 पैशांवरून 1 रुपये करण्यात आली.
2. प्रत्येक काडी पेटीत 50 काड्या असतात. काडी पेटी तयार करण्यासाठी 14 प्रकारचा कच्चा माल आवश्यक आहे. ज्यामध्ये लाल फॉस्फरस, मेण, कागद, स्प्लिंट्स, पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरचा प्रामुख्याने वापर केला जातो.
3. भारतातील सर्वात मोठा काडी पेटीचा उद्योग तामिळनाडूमध्ये आहे. तमिळनाडूतील शिवकाशी, विरुधुनगर, गुडियाथम आणि तिरुनेलवेली ही मुख्यतः उत्पादन केंद्रे आहेत. सध्या भारतात काडी पेटीच्या अनेक कंपन्या आहेत, बहुतेक कारखाने अजूनही हाताने काम करतात. तर काही कारखान्यांमध्ये मशीनच्या साहाय्याने आगपेटी तयार केली जाते.
4. तामिळनाडूमध्ये सुमारे चार लाख लोक या उद्योगात काम करतात. यातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचारी महिला आहेत. काडी पेटीच्या किंमती वाढल्यानं कर्मचाऱ्यांचे उत्पन्न वाढते. कर्मचाऱ्यांना काडी पेटी बनवण्याच्या क्षमतेनुसार पैसे दिले जातात.
5. भारतामध्ये काडी पेटीचे उत्पादन 1895 मध्ये सुरू झाले. त्याचा पहिला कारखाना अहमदाबाद आणि नंतर कोलकाता येथे सुरू झाला. स्वीडनमधील मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने भारतात मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उघडली.
6. 31 डिसेंबर 1827 रोजी ब्रिटनमध्ये जगात पहिल्यांदा काडीचा शोध लागला. याचा शोध लावणाऱ्या जॉन वॉकर या शास्त्रज्ञाने काडी तयार केली होती. जी कोणत्याही खडबडीत पृष्ठभागावर घासल्यास जळू शकते.
7. काडी पेट्यांवर फॉस्फरस लावला जातो. फॉस्फरस हा अत्यंत ज्वलनशील रासायनिक घटक आहे. तमिळनाडूतील पहिला आगपेटीचा कारखाना 1922 मध्ये शिवकाशी शहरात सुरू झाला. पूर्वी पांढरा फॉस्फरस वापरला जात होता. यावेळी काडी जळत असताना निघणारा धूरही अत्यंत विषारी होता. नंतर पांढऱ्या फॉस्फरसच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या: