RBI News : कर्ज महाग होणार? व्याजदरांबाबत होणार मोठी घोषणा? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास जारी करणार निवेदन
RBI News : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर व्याजदरांबाबत काही मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे
RBI News : RBI गव्हर्नर शक्तीकांत दास दुपारी 2 वाजता निवेदन जारी करणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर व्याजदरांबाबत काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे गव्हर्नर रेपो रेट वाढवतील अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाढती महागाई बनली चिंतेचे कारण
महागडे खाद्यपदार्थ आणि महागड्या वस्तू आणि इंधनामुळे मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.95 टक्के इतका राहिला आहे. जी आरबीआयच्या सहा टक्के सहनशीलतेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. एप्रिलमध्ये 2022-23 साठीच्या पहिल्या द्वि-मासिक पतधोरण जाहीर करताना, आरबीआय गव्हर्नरने स्वत: सांगितले होते की, केंद्रीय बँकेचे प्राधान्य आता महागाई रोखणे असेल. आरबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून आरबीआयचे गव्हर्नर दुपारी 2वाजता निवेदन देणार असल्याची माहिती आरबीआयच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
Watch out for the statement by the RBI Governor @DasShaktikanta at 2:00 pm on May 04, 2022
— ReserveBankOfIndia (@RBI) May 4, 2022
YouTube: https://t.co/gil2KUy5MP#rbitoday #rbigovernor
आरबीआयचे गव्हर्नर दुपारी 2वाजता निवेदन देणार
जूनमध्ये, आरबीआय या वर्षाचे दुसरे द्वि-मासिक कर्ज धोरण जाहीर करेल, ज्याबाबत असे बोलले जात होते की, आरबीआय रेपो दरात 25 आधार पॉइंट्सने वाढ करण्याची घोषणा करू शकते. पण असेही मानले जात आहे की, आरबीआय गव्हर्नर आज 2 वाजता व्याजदर वाढवण्याची घोषणा करू शकतात. अनेक बँकांनी कर्जापासून ते ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केल्याने व्याजदरही वाढण्याची शक्यताआहे. अलीकडेच गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीने गृहकर्ज महाग केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनाचा मोठा फटका, भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी लागणार दशकभरापेक्षा जास्त काळ
Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण