फक्त 2 वर्षात मिळवा 2.32 लाख रुपये, पोस्ट ऑफिसच्या 'या' भन्नाट योजनेचा लाभ घ्या
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Saving Certificate) योजना ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात तुम्हाला 2.32 लाख रुपये मिळतील. जाणून घेऊयात माहिती.
Post Office Yojana : देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकार (Govt) विविध योजना चावलते. या योजनांच्या (Yojana) माध्यमातून सामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचं काम सरकार करते. दरम्यान, सरकारच्या अनेक अशा योदना आहेत की, ज्या पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Saving Certificate) योजना. ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन वर्षात तुम्हाला 2.32 लाख रुपये मिळतील. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
ज्येष्ठ नागरिकांसह महिलांसाठी देखील सरकार विविध योजना चालवत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांना चांगला परतावा मिळत आहे. यातीलच एक योजना म्हणजे महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजना सर्टिफिकेट. या योजनेच्या माध्यमातून फक्त दोन वर्षातच 2.32 लाख रुपये मिळतात. पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांमध्ये कोणताही धोका नसतो. या योजनांमध्ये कर सवलतीपासून ते मासिक उत्पन्न आणि हमी परताव्यापर्यंतचे फायदे मिळतात.
नेमकी काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना?
महिलांसाठी सरकारनं विविध योजना सुरु केल्या आहेत. महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सरकारनं सुरु केलीय. या योजनेअंतर्गत तुम्ही 1000 ते 2 लाख रुपये जमा करु शकता. जमा केलेली रक्कम केवळ 100 च्या पटीत असावी. या योजनेअंतर्गत अनेक खाती उघडली जाऊ शकतात, परंतु ठेवीची रक्कम कमाल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी. या योजनेअंतर्गत दुसरे खाते उघडण्याच्या तारखेत 3 महिन्यांचे अंतर असावे.
या योजनेत किती परतावा?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत वार्षिक 7.5 टक्के व्याज दिले जाते. व्याज तीन महिन्यांच्या आधारावर जमा केले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी फक्त 2 वर्षांचा आहे.ठेवीच्या तारखेपासून एक वर्षानंतर उर्वरित रकमेपैकी कमाल 40 टक्के रक्कम काढता येते. मुदतपूर्तीपूर्वी फक्त एकदाच आंशिक पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
मॅच्युरिटीवर मिळणार 2.32 लाख रुपये
तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवू शकता. तुम्हाला 7.50 टक्के दराने 32044 रुपये व्याज मिळेल. अशा परिस्थितीत दोन वर्षांत एकूण रक्कम 2,32044 रुपये मॅच्युरिटीवर दिली जाईल.
योजनेच्या अटी आणि नियम काय?
खातेदारांचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी किंवा कुटुंबातील सदस्य या ठेवी काढू शकतात. जीवघेण्या आजारांच्या बाबतीत वैद्यकीय सहाय्यासाठी रक्कम काढली जाऊ शकते. पैसे काढल्यानंतर तुम्ही खाते बंदही करू शकता. खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतर खाते बंद करण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला 2 टक्के कमी व्याजाने रक्कम दिले जाईल.
महत्वाच्या बातम्या: