एक्स्प्लोर

सरकारच्या 'या' एका योजनेमुळे महिला होतात मालामाल, 2 वर्षांत मिळतात थेट 2.32 लाख रुपये!

पोस्ट ऑफिस विभागातर्फे अनेक योजना चालवल्या जातात. यामध्ये महिलांसाठीही काही विशेष योजना आहेत. यातीलच एका योजनेच्या मदतीने महिलां चांगले पैसे कमवू शकतात.

मुंबई : देशातील नागरिक आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावेत यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यातील काही योजना या तरुणांसाठी तर काही योजना या महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतात. सरकारच्या बहुसंख्य योजना या पोस्ट ऑफिस विभागातर्फे चालवल्या जातात. दरम्यान, याच पोस्ट ऑफिस विभागातर्फे खास महिलांसाठी एक योजना चालवली जाते. या योजनेत गुंतवणूक केल्यास महिलांना तब्बल 7.5 टक्क्यांनी व्याज दिले जाते. विशेश म्हणजे फक्त दोन वर्षांत महिलांना तब्बल 2.32 लाख रुपये मिळू शकतात.

दोन लाख रुपये जमा करता येणार

महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजना सर्टिफिकेट (Mahila Samman Saving Certificate) असे या योजनेचे नाव आहे. ही एक स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे. महिलांना आर्थिक सहाय्यता मिळावी म्हणून केंद्र सरकारकडून ही योजना विशेष रुपाने चालू करण्यात आली आहे. या योजनेत 1000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. तुम्ही जमा केलेली रक्कम ही 100 रुपयांच्या पटीत असली पाहिजे. या योजनेच्या माध्यमातून एक व्यक्ती कितीही खाते खोलू शकते. पण तुम्हाला या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपयेच जमा करता येतात. तसेच दुसरे खाते खोलताना तीन महिन्यांचे अंतर असणे गरजेचे आहे.

व्याज किती मिळणार?  

या योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर वर्षाला 7.5 टक्के व्याज दिलं जातं. प्रत्येक तीन महिन्याला हे व्याज तुमच्या खात्यावर जमा केले जाते. या योजनेची मॅच्यूरिटी ही फक्त दोन वर्षांची आहे. असे असले तरी आपत्कालीन स्थितीत तुम्हाला एका वर्षात जमा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 40 टक्के रक्कम काढून घेता येते. ही आपत्कालीन रक्कम फक्त एकदाच काढता येते. 

मॅच्यूरिटीनंतर मिळणार 2.32 लाख रुपये  

या योजनेअंतर्गत तुम्ही समजा 2 लाख रुपये जमा केले तर 7.50 टक्के व्याजाच्या हिशोबाने तुम्हाला एकूण 32044 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला दोन वर्षांत एकूण 2,32044 रुपये मिळतील. 

योजनेचे नियम काय?  

या योजनेअंतर्गत खातेदार महिलेचा अचानक मृत्यू झाला तर त्या महिलेच्या कुटुंबीयांना जमा असलेली रक्कम काढता येते. गंभीर आजारावर उपचारासाठीदेखील या योजनेतून रक्कम काढता येते. पैसे काढून घेतल्यानंतर तुम्ही खाते बंद करू शकता. या योजनेअंतर्गत खाते चालू केल्यवर 6 महिन्यांनतर ते बंद करता येते. अशा स्थितीत तुम्हाला दोन टक्के कमी व्याजाने रक्कम दिले जाते. 

हेही वाचा :

'हे' नऊ पेनी स्टॉक करणार कमाल, तुमचा खिसा पैशांनी भरणार; मालामाल होण्याची संधी!

नवं क्रेडिट कार्ड घेताय? जाणून घ्या काय काळजी घ्यावी; अन्यथा होऊ शकतो मोठा तोटा!

माही भाई आता दिसणार नव्या भूमिकेत, 'या' कंपनीशी केला महत्त्वाचा करार!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Embed widget