एक्स्प्लोर

27 एकरचं मैदान, 3 हेलिपॅड, मोदींच्या सभेसाठी चोख बंदोबस्त, महादेव जानकरांसाठी महायुतीची तगडी फिल्डिंग!

परभणीत महायुतीने महादेव जानकर यांना तिकीट दिले आहे. महादेव जानकर यांचा विजय व्हावा यासाठी आता थेट मोदी परभणीत सभा घेणार आहेत.

परभणी : सध्या महाराष्ट्रात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे. आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास  (Maha Vikas Aghadi)आघाडी यांच्यातील घटकपक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. महायुतीकडून तर उमेदवारांच्या विजयासाठी थेट केंद्रातील नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवलं जात आहे. परभणीत महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) परभणीत (Parbhani) येत आहेत. 20 एप्रिल रोजी मोदी यांची परभणीत जाहीर सभा होणार आहे. 

जानकरांना शरद पवार देणार होते तिकीट, पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 एप्रिल रोजी परभणीच्या दौऱ्यावर असणार आहेत. येथे ते महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी भाजप तसेच महायुतीकडून केली जात आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जानकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तशी सकारात्मकता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्व शरद पवार यांनीदेखील त्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. मात्र जानकर यांना ऐनवेळी महायुतीने परभणीतून कितीट दिले आहे. तिकीट मिळाल्यानंतर आता जानकर हे संपूर्ण परभणी जिल्ह्यात पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. 

मोदींच्या सभेसाठी नेमकी तयारी काय? 

मोदी यांच्या सभेसाठी महायुतीने जय्यत तयारी केली आहे. परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील लक्ष्मी नगरी या परिसरात 27 एकर परिसरात मोदी यांची ही सभा होणार आहे. मोदी यांना सभास्थळी उतरण्यासाठी तीन हेलिपॅडची उभारण्यात आले आहेत. तसेच या सभेत एक ते दीड लाख लोक बसतील एवढी आसन क्षमता उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या सभास्थळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे.

जानकरांनी मोदींच्या सभेबाबत दिली होती माहिती

एकंदरीतच अनेक वर्षानंतर पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती परभणीत प्रचारासाठी येत असल्याने, ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जातोय. मोदी यांच्या या सभेबाबत जानकर यांनी काही दिवसांपूर्वी सूतोवाच केले होते. माझ्या प्रचारासाठी थेट मोदी परभणीत सभा घेणार आहेत, असे जानकर यांनी जाहीर सभेत सांगितले होते. 

वंचितनेही दिला उमेदवार, कोणाचा विजय होणार?

दरम्यान, जानकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने संजय जाधव यांना तिकीट दिले आहे. जाधव हे परभणीचे विद्यमान खासदार आहेत. येथे जानकर विरुद्ध जाधव अशी लढत होत आहे. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 December 2024Supriya Sule On EVM Machine :  EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदVarun Sardesai On Aaditya Thackeray : दोन भावांची जोडी विधानभवनात!वरुण सरदेसाई म्हणतात..Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Embed widget