LIC IPO : ठरलं! फादर ऑफ ऑल आयपीओ लवकरच येणार
LIC IPO : एलआयसीनं आयपीओ बाजारात आणण्यासाठी सेबीकडे अर्ज केला आहे. त्यामुळे आता एलआयसीचा आयपीओ महिन्याभरात येणार हे निश्चित झालं आहे.
LIC IPO : गेल्या काही महिन्यांपासून एलआयसीचा आयपीओ कधी येणार याबाबत चर्चा सुरू आहेत. पण आता एलआयसीचा आयपीओ येणार हे निश्चित झालं आहे. एलआयसीनं आयपीओ बाजारात आणण्यासाठी सेबीकडे अर्ज केला आहे. त्यामुळे आता एलआयसीचा आयपीओ महिन्याभरात येणार हे निश्चित झालं आहे.
फादर ऑफ ऑल आयपीओ का?
एलआयसीचा आयपीओ हा जवळपास 65 ते 75 हजार कोटींचा असू शकतो. सरकार एलआयसीतील 5 टक्के समभाग म्हणजेच शेअर विकणार आहेत. आणि यातून 65 ते 75 हजार कोटी उभारण्याचा मानस सरकारचा आहे. आतापर्यंत सर्वाधित मोठा आयपीओ हा नुकतीच लिस्टिंग झालेली पेटीएम कंपनी आहे. पेटीएम कंपनीचा आयपीओ हा 18 हजार 500 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे एलआयसीच्या आयपीओला फादर ऑफ ऑल आयपीओ म्हटलं जातं आहे.
एलआयसीचा आयपीओ का महत्त्वाचा?
सर्वसामान्यांची एलआयसीच्या पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असते. एलआयसीच्या पॉलिसी धारकांसाठी विशेष कोटा ठेवण्याची शक्यता आहे. बरेच गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओत गुंतवणूक करू शकतात.
आतापर्यतचे दिग्गज आयपीओ
- कोल इंडिया 15 हजार कोटींचा आयपीओ
- पेटीएम 18 हजार 500 कोटींचा आयपीओ
- सौदी अरब सरकारच्या सौदी अरामकोने 25.6 बिलियन डॉलरचा आयपीओ
एलआयसीवर गुंतवणूकदारांच्या नजरा का?
एलआयसीचे 29 कोटी विमाधारक असून त्यांना आयपीओमध्ये स्वस्तात शेअर्स मिळवण्याची उत्तम संधी आहे. जवळपास 13 लाख एजंट आहेत. एका मोठ्या नेटवर्कमुळे एलआयसीच्या आयपीओला प्रतिसाद मिळण्याची दाट शक्यता आहे. एलआयसी आयपीओमध्ये तब्बल 31 कोटी 62 लाख शेअर्सची विक्री होणार आहे. एलआयसीच्या आयपीओमध्ये पॉलिसी होल्डर्ससाठी 10 टक्के कोटा असणार आहे. ज्या पॉलिसी होल्डर्सनं आपला पॅन नंबर एलआयसीकडे 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अपडेट केला आहे तेच या कोट्यासाठी पात्र असणार आहेत.
संबंधित बातम्या
LIC IPO : LIC IPO मध्ये पॉलिसीधारकांना मिळणार सूट, बोर्डाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
जागतिक ब्रँड क्रमवारीत LIC ची 206 व्या क्रमांकावर झेप, जगातील टॉप 10 विमा ब्रँडमध्ये समावेश
LIC IPO : तुमच्याकडे विमा पॉलिसी असेल तर शेअर्स स्वस्त मिळणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha