एक्स्प्लोर

जागतिक ब्रँड क्रमवारीत LIC ची 206 व्या क्रमांकावर झेप, जगातील टॉप 10 विमा ब्रँडमध्ये समावेश

LIC gain in Top Brands List : 2021 मध्ये, LIC ने जागतिक ब्रँड क्रमवारीत 206 व्या स्थानावर झेप घेतली आहे आणि जगातील टॉप 10 विमा ब्रँडच्या यादीत समावेश केला आहे.

LIC Brand News : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(LIC) निर्गुंतवणुकीसाठी तयार असलेली देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC हा $ 8.656 अब्ज (सुमारे 64,772 कोटी) मूल्यांकनासह देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा ब्रँड आहे. या रेटिंगमुळे LIC जगातील सर्वात 'मजबूत' विमा ब्रँड बनला आहे. लंडनस्थित ब्रँड फायनान्स या ब्रँड सल्लागार कंपनीच्या मते, LIC चे बाजार मूल्य 2022 पर्यंत 43.40 लाख कोटी रुपये म्हणजेच, $59.21 अब्ज आणि 2027 पर्यंत रुपये 59.9 लाख कोटी ($78.63 अब्ज) असण्याचा अंदाज आहे.

रिपोर्ट्सनुसार, जगातील 10 सर्वात मौल्यवान विमा  ब्रँडपैकी एक LIC आहे. याचाच अर्थ, LICच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा LIC प्रथम क्रमांकावर आहे. तर इटली पोस्ट इटालियन आणि स्पेनच्या मॅपफ्रे नंतर जागतिक स्तरावर ब्रँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे जगातील 10 सर्वात मौल्यवान विमा ब्रँडपैकी एक आहे. हा अहवाल नोव्हेंबर 2021 मध्ये तयार करण्यात आला होता. पण तो आता सार्वजनिक करण्यात आला आहे.

LIC ची 32 स्थानांची झेप 
2021 मध्ये जागतिक ब्रँड क्रमवारीत 32 स्थानांनी झेप घेऊन LIC 206 व्या क्रमाकांवर पोहोचली आहे. ब्रँड फायनान्सच्या मते, 2021 मध्ये $8.655 अब्ज मूल्यांकनासह LIC हा देशातील सर्वात मोठा आणि मजबूत ब्रँड आहे. 2020 मध्ये त्याचे मूल्य $8.11 अब्ज होते. म्हणजेच, 6.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

LIC ची ब्रँड व्हॅल्यू 6.8 टक्क्यांनी वाढली
2021 मध्ये जगातील 100 प्रमुख विमा कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू सहा टक्क्यांनी घसरून $433 अब्ज झाली आहे. LIC च्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 6.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टॉप 10 कंपन्यांमध्ये पाच चीनी कंपन्यांचाही समावेश
टॉप 10 मध्ये समावेश अहवालानुसार टॉप 10 मध्ये 5 चीनी विमा कंपन्या आहेत. पिंग एन इन्शुरन्स ब्रँड मूल्यात 26 टक्क्यांनी घट नोंदवूनही जगातील सर्वात मौल्यवान विमा ब्रँड बनला आहे. पहिल्या 10 मध्ये दोन अमेरिकन कंपन्या आहेत. तर, फ्रान्स, जर्मनी आणि भारताची प्रत्येकी एक कंपनी आहे. LIC ही एकमेव देशांतर्गत विमा कंपनी आहे जी अव्वल 10 सर्वात मजबूत ब्रँड आणि टॉप 10 मध्ये याचा समावेश झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : त्या सर्व्हेची ऐसी की तैसी, 160 जागा आम्ही जिंकणारच! राऊतांचा हल्लाबोल#abpमाझाRajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
एक्झिट पोल बाजूला करत सरकार स्थापनेसाठी वेळ कमी असल्याने निकालापूर्वीच महाविकास विकास आघाडीचा तगडा निर्णय!
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
संजय राऊतांचा खळबळजनक दावा, महायुतीकडून अपक्षांना मेसेज गेले, प्रत्येकाला 50 कोटींची ऑफर?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
Ind vs Aus 1st Test : गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
गुलिगत धोका! KL राहुल OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ, नेमकं काय घडलं? Video
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Embed widget