एक्स्प्लोर

LIC IPO GMP: एलआयसीची उद्या लिस्टिंग, ग्रे मार्केटमध्ये दर घसरला; गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली

LIC IPO Listing : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी उद्या शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहे. मात्र, त्याआधीच ग्रे मार्केटमधील प्रीमियम दरात घसरण झाल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

LIC IPO Listing : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) उद्या शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्ट) होणार आहे. एलआयसीचा आयपीओ विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आले. आयीपीओ मिळालेल्या गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात आज एलआयसीचे शेअर्स जमा होणार आहे. त्यानंतर आता उद्या शेअर बाजारात एन्ट्री घेणार आहे. ग्रे मार्केटमध्ये (LIC IPO Grey Market Price)  असलेल्या दरामुळे गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली आहे. 

ग्रे मार्केटमध्ये एलआयसीच्या आयपीओ लिस्टिंगसाठी असलेल्या दरात सध्या घसरण सुरू आहे. एलआयसीचा आयपीओ खुला झाल्यानंतरच्या एक दोन दिवसात ग्रे मार्केट प्रीमियम प्राइस 95 रुपयांहून अधिक झाली होती. त्यानंतर हा दर सातत्याने घसरत आहे. एका आघाडीच्या टॉप शेअर ब्रोकर फर्मने सांगितलेल्या माहितीनुसार, सध्या एलआयसीचा आयपीओ प्रीमियम दर हा सध्या शून्य ते 19 रुपयांपर्यंत आहे. तर, IPO Watch वर एलआयसी आयपीओचा प्रीमियम दर उणे 25 रुपये दाखवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी झटका बसू शकतो. पॉलिसीधारकांना आणि एलआयसी कर्मचाऱ्या

ग्रे बाजारातील प्रीमियम दर म्हणजे काय?

एखाद्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी ग्रे मार्केट त्याला कसा प्रतिसाद देतो यावर लिस्टिंग प्रीमियमचा अंदाज बांधला जातो. एलआयसीने आपल्या एका शेअरची किंमत 949 रुपये ठरवली आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम दर 0 ते 19 रुपये सुरू आहे. याचा अर्थ 949 रुपये + 19 रुपये या किंमतीवर एलआयसीचा शेअर लिस्ट होण्याचा अंदाज आहे. 

एलआयसी होणार देशातील पाचवी मोठी कंपनी

उद्या एलआयसी शेअर बाजारात डिस्काउंटमध्येही लिस्ट झाल्यानंतर एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य (मार्केट कॅप) 6 लाख कोटींहून अधिक राहण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास, एलआयसी ही शेअर बाजारात लिस्ट होणारी भारतातील पाचवी मोठी कंपनी ठरणार आहे. बाजार भांडवल दराच्या मूल्यानुसार, सध्या एलआयसीपेक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल अधिक आहे. 

एलआयसी IPO ला चांगला प्रतिसाद

एलआयसी आयपीओला गुंतवणुकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक सब्सक्रिप्शन पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या कोट्यात झाले. पॉलिसीधारकांसाठीच्या कोट्यात 6.12 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते. त्याच वेळेस एलआयसीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यात 4.4 पटीने सब्सक्रिप्शन झाले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक समितीच्या शिफारसीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात  9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी 
आयपीओची मालिका सुरुच, आठवड्यात 3500 कोटींचे 9 IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी 
Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?
छगन भुजबळांसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का वगळलं?
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Embed widget