एक्स्प्लोर

Larry Ellison world's Richest Person : आई सोडून गेली, काकाने सांभाळ केला, आज तोच पठ्ठ्या जगातील सर्वात श्रीमंत बनला, एलन मस्कलाही पछाडलं, 24 तासात पहिल्या नंबरवर!

Larry Ellison world's Richest Person : लॅरी एलिसन यांनी इलॉन मस्कला (Elon Musk) मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

Larry Ellison world's Richest Person : जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. ओरेकलचे  (Oracle) 81 वर्षीय सह-संस्थापक लॅरी एलिसन (Larry Ellison) यांनी इलॉन मस्कला (Elon Musk) मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index) लॅरी एलिसन यांची नेटवर्थ 393 बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 34.60 लाख कोटी रुपये आहे, जी इलॉन मस्कच्या 385 बिलियन डॉलर्स (385 Billion Dollars) म्हणजेच सुमारे 33.90 लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थपेक्षा जास्त आहे.

ओरेकलचे शेअर वाढ (Oracle Earnings & Stock Surge)

या ऐतिहासिक बदलाचे कारण मंगळवारी संध्याकाळी ओरेकल (Oracle) च्या शेअर्समध्ये झालेली मोठी वाढ आहे. 10 सप्टेंबर रोजी अमेरिकन शेअर बाजार उघडताच, कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 41% वाढ झाली, ज्यामुळे लॅरी एलिसन (Larry Ellison) यांच्या जवळ कंपनीचे 116 कोटी शेअर्स असल्यामुळे शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीचा थेट परिणाम त्यांच्या नेटवर्थवर झाला आणि एका दिवसातच त्याची संपत्ती तब्बल 9 लाख कोटी रुपयांनी वाढली. विशेष म्हणजे, याच वर्षी जून महिन्यात लॅरी एलिसन यांनी जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना मागे टाकत ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती.

लॅरी एलिसन कोण आहेत? (Who is Larry Ellison?)

लॅरी एलिसन यांचा जन्म 1944 मध्ये न्यूयॉर्क शहरात एका अविवाहित ज्यू महिलेच्या घरी झाला. त्यांची आई फ्लॉरेन्स स्पेलमन (Florence Spellman) या ज्यू महिलेच्या घरी त्यांचा जन्म झाला. केवळ नऊ महिन्यांचे असताना लॅरी एलिसनला निमोनिया झाला आणि त्यानंतर त्याच्या आईने त्याला त्यांच्या काका-काकू लिलियन (Lillian) आणि लुई (Louis Ellison) यांच्याकडे दिले. लॅरी एलिसन यांच बालपण शिकागो येथे गेले. बाराव्या वर्षी जेव्हा त्यांना हे समजले की त्याला दत्तक घेतले गेले आहे, तेव्हा ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का होती. याचा त्यांच्या विचारसरणीवर आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर खोल परिणाम झाला. वयाच्या 48 व्या वर्षापर्यंत लॅरी एलिसन यांनी आपल्या आईचा चेहरा पाहिला नाही. 

ओरेकलची स्थापना (Founding of Oracle)

1977 मध्ये लॅरी एलिसन (Larry Ellison) यांनी डेटाबेस सॉफ्टवेअर (Database Software) कंपनी म्हणून ओरेकलची स्थापना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर ही कंपनी एका जागतिक क्लाउड कंप्यूटिंग पॉवरहाऊस मध्ये रूपांतरित झाली. आज 80 वर्षांचे लॅरी एलिसन हे ओरेकल कॉर्पोरेशनचे चेअरमन (Chairman) आणि चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!
Aadhaar Card Limit Exhausted : आधारकार्ड दुरुस्त लिमिट संपली? चिंता करू नका, ही ट्रिक्स वापरा!
EPFO :  नोकरी सोडल्यानंतर Date of Exit ची चुकीची नोंद कशी दुरुस्त करायची? ईपीएफओ पोर्टलवर रेकॉर्ड अपडेट कसं करायचं?  
पीएफ खात्यातील चुकलेली Date of Exit कशी दुरुस्त करायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Starlink in India : भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
भारतात एलन मस्क यांच्या स्टारलिंकची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा, ट्रायच्या शिफारशींवर मोठा निर्णय
Devendra Fadnavis on western dedicated freight corridor: चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व
चीनला टक्कर देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल, फडणवीसांनी सांगितलं वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरचं महत्त्व

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget