एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : आता नवीन फॉर्म भरा, लगेच 4500 रुपये मिळवा? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे.

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारनं सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही लोकप्रिय योजना ठरत आहे. राज्यातील कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. यातील बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे. दरम्यान, या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म आला आहे. व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासाठी सरकारने नवीन जीआर काढला आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. तर ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. परंतु, ज्या महिलांनी अर्ज भरला नाही, त्यांना आता नवीन अर्ज भरता येणार आहे.

कसा भराल नवीन अर्ज?

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन अर्ज भरण्यासाठी प्रथम तुम्ही ladkibahin.maharashtra.go.in या पेजला भेट द्यायची आहे. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, 1 कोटींहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. या पोर्टलवर 84 लाखांहून अधिक अर्ज मंजूर झालेले आहेत. प्रथम तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नवीन असल्यास खाते तयार करा, या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत टाईप करा. मोबाईलचा नंबर टाकून पासवर्ड सेट करा. जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर क्लिक करा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा. ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

'ही' माहिती व्यवस्थित अचूक भरा

आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हिलेडटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत टाईप करायचं आहे. वडिलांचे नाव कॉलममध्ये लिहियाचं. विवाहित असल्यास पतीचं नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत भरायचं आहे. वैवाहिक स्थितीमध्येही विकल्प निवडून इंग्रजीत माहिती भरा. आधारकार्ड प्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होयवर क्लिक करा. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या राज्यात जन्म झाला आहे त्याच्यावर क्लिक करा आणि कागदपत्र अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे नमूद करा. पिनकोड भरा. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका सिलेक्ट करा. जो मतदारसंघ असेल, तो सिलेक्ट करा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक भरून टाका.

आधारकार्डला ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाते क्रमांक भरा

तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाबाबत मेसेज येतील. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाता क्रमांक भरा. बँकेची इतर माहिती भरा. आयएफएससी कोड भरा. बँक खाते आधारकार्डशी लिंक असेल, तर होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते जोडलं गेलं नसेल, तर ते लिंक करून घ्या. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी. आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागील बाजू अपलोड करा.

 केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास योग्य पर्याय निवडा

अधिवास प्रमाणपत्रात तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करू शकता. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास योग्य पर्याय निवडा. तसच रेशनकार्डची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करायची आहे. नसेल तर नाहीवर क्लिक करून उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा. नसल्यास डाऊनलोड करा. हमीपत्राच्या प्रत्येक पर्यायावर टीक मार्क करायची. त्यानंतर सही करायची. त्यानंतर बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा. त्यानंतर डिल्केरेशनला क्लिक करून सबमिटवर क्लिक करायचं. सेव्ह अॅज ड्राफ्टवर क्लिक करू नका. हमीपत्र स्वीकारा यावार क्लिक करा आणि अर्ज तपासून घ्या. 

दरम्यान, अचूकपणे व्यवस्थित हा फॉर्म भरल्यास तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळू शकतात. यामध्ये कोणतीही अडचण येत नाही.

महत्वाच्या बातम्या:

Ladki bahin yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, विषय मंत्रिमंडळात; निधी कुठेही न वळवल्याचा 'स्वयंस्पष्ट आदेश'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget