एक्स्प्लोर

Ladki bahin yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, विषय मंत्रिमंडळात; निधी कुठेही न वळवल्याचा 'स्वयंस्पष्ट आदेश'

Ladki bahin yojana: शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे.

Ladki bahin yojana: मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेसाठी देण्यात आलेला निधी हा इतर योजनांचा निधी इकडे वळवण्यात आल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. विशेष म्हणजे शेतकरी (Farmer) आत्महत्याग्रस्त कुटुंबांना देण्यात येणारा निधी या योजनेत सरकारने वळवल्याचेही वृत्त होते. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळले असून आजच्या मंत्रिमंडळ (Ministry) बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर, स्वयंस्पष्ट आदेश काढण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना दरमहा मिळणारे 1500 रुपये लाभास सध्यातरी कुठलीही अडचण नसल्याचे दिसून येते. 
 
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत कोठेही बंद करण्यात आलेली नाही. या लेखाशिर्षात पुरेशी तरतूद उपलब्ध आहे. तथापि जेव्हा तरतूद नसते, तेव्हा ही गैरसोय होऊ नये म्हणून उणे प्राधिकार सुविधा वापरली जाते. मात्र, पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याने ही उणे तरतूद वापरण्याची गरज नाही एवढाच त्या आदेशाचा अर्थ आहे. याबाबतीत स्वयंस्पष्ट आदेश जारी करण्यात आला आहे, असे मदत व पुनर्वसन विभागाने आज मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे, लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांना सध्यातरी कुठलीही अडचण नाही, किंवा इतर योजनेचा निधी तिकडे वळवला, असंही नाही. लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत, शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

काय आहे नेमका विषय

राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने एक परिपत्रक काढलं आहे. त्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केली. परिणामी, या लेखाशीषांत रक्कम शिल्लक नसेल तर जिल्हापातळीवरील समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत करु शकणार नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी वळवण्यात आल्याचे वृत्त समाज माध्यमांत पसरले आहे. मात्र, यावर राज्य सरकारने आता स्पष्टीकरण दिलं आहे. 

सहा महिन्यात हजारपेक्षा जास्त आत्महत्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा संकल्प सोडला होता. प्रत्यक्षात, शेतकरी आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आल्याचे दिसून येते. कारण, गेल्या सहा महिन्यांत विदर्भात 618 आणि मराठवाड्यात 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्माहत्या रोखणे तर दूर, उलट आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना शासनातर्फे जी तातडीची मदत दिली जात होती, त्याबाबतही शासनाने हात आखडता घेतला आहे.

हेही वाचा

आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaGateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Embed widget