किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्या, कमी व्याजदरात एवढ्या लाखांचं कर्ज मिळवा; जाणून घ्या प्रक्रिया
सरकारकडून शेतकऱ्यांना (Farmers) मदत करण्यासाठी अनेक कामे केली जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) आहे.
kisan credit card : सरकारकडून शेतकऱ्यांना (Farmers) मदत करण्यासाठी अनेक कामे केली जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (Kisan credit card) आहे. या कार्डद्वारे शेतकरी बांधवांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते. या कार्डसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय किती असावे? तसेच, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याची सविस्तर माहिती आपण या या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.
3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात
किसान क्रेडिट कार्डद्वारे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात सहज उपलब्ध होत आहे. या कर्जावरील व्याजदर 7 टक्क्यांपासून सुरु होतो. त्याचबरोबर कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात 3 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. अशाप्रकारे, किसान क्रेडिट कार्डवरुन घेतलेल्या कर्जावर केवळ 4 टक्के व्याजदर भरावा लागेल.
किसान क्रेडिट कार्डचा लाभ कोणाला मिळतो?
किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय 18 ते 75 वर्षे दरम्यान असावे. शेतकऱ्याकडे किमान दोन एकर शेतजमीन असावी. याशिवाय शेतकरी बांधवांचे बँक खाते असणेही आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याने संबंधित बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक आहे. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी कामांसाठी आवश्यक निधी मिळू शकतो. शेतकरी हे बँकेकडून घेतलेलं कर्ज खते, बियाणे, कृषी यंत्रे, पशुसंवर्धन, मत्स्यपालन इत्यादींसाठी वापरु शकतात.
किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
शिधापत्रिका
शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे
बँक खाते माहिती
शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डचा वापर
शेतकऱ्यांनी घेतलेली कृषी उत्पादने ही अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. कारण ज्यामध्ये हवामान हा प्रमुख घटक आहे. अनेक वेळा वादळ, पूर, अतिवृष्टी आदींमुळे पिकांचे नुकसान होते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागते. खासगी संस्थेकडून उच्च व्याजदराने कर्ज घेऊ शकतात, मात्र नंतर त्यांच्यावर ईएमआयचे ओझं वाढू शकतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केले. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करू शकता. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज भरा.
महत्त्वाच्या बातम्या: