नेमकी काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना? कोणाला मिळणार 'या' योजनेचा लाभ
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे.
Namo shetkari maha samman nidhi yojana : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची मदत देते. त्याच धर्तीवर राज्य सरकाक देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळं आता दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 12000 रुपये येणार आहेत. म्हणजे प्रत्येकी चार महिन्याला शेतकऱ्यांना आता 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये मिळणार आहेत.
85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ
गुरुवारी (27 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पंतप्राधन नरेंद्र मोदी हे काल शिर्डीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्त विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यानंतर मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. काल पंतप्रधानांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला.
काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, कोणाला मिळणार लाभ
दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील. जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळं शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी ज्या बँक खात्याचा तपशील दिलाय तोच यासाठी द्यावा लागणार आहे.
नमो शेतकरी सन्मान योजनेचे सर्वाधिक लाभार्थी अहमदनगर जिल्ह्यात
नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले हेत. त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: