एक्स्प्लोर

KFin Technologies Listing:  KFin Technologies शेअर दरात लिस्टिंगनंतर घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावे?

KFin Technologies Listing: केफिन टेक्नॉलॉजी कंपनी आज बाजारात सूचीबद्ध (KFin Technologies Listing in Stock Market) झाली. किरकोळ प्रीमियम दराने लिस्टिंग झाली. त्यानंतर बाजारात शेअर दरात घसरण दिसून आली.

KFin Technologies Listing:  केफिन टेक्नॉलॉजीच्या आयपीआयोची आज शेअर बाजारात लिस्टिंग झाली. आज, गुरुवारी KFin Technologies चे शेअर्स बाजारात लिस्ट झाले. KFin Technologies मुंबई शेअर बाजारात 0.82 टक्क्यांच्या प्रीमियमसह 369 रुपयांवर लिस्ट झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजारावर 367 रुपयांवर सूचीबद्ध झाला. KFin Technologies च्या आयपीओत प्रति शेअर 366 रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. बाजारात शेअर लिस्ट झाल्यानंतर घसरण सुरू झाली. 

सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, KFin Technologies चा शेअर दर 2.35 टक्क्यांच्या घसरणीसह 357 रुपयांवर व्यवहार करत होता. त्यामुळे आयपीओत शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य?

शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार, हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीत हा शेअर चांगला परतावा देईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या बाजारात सुरू असलेल्या घसरणीची चिंता करू नये असेही तज्ज्ञांनी म्हटले. KFin Technologies ही भारतीय म्युच्युअल फंडमधील सर्वात मोठी इन्वेस्टर सोल्यूशन प्रोवाइडर कंपनी आहे.  

KFin Technologies च्या IPO च्या लिस्टिंगनंतर कंपनीचे बाजार मूल्य 5906 कोटी रुपये इतके झाले. IPO 19 डिसेंबर रोजी उघडला गेला आणि गुंतवणूकदारांना 21 डिसेंबरपर्यंत आयपीओत बोली लावण्यासाठीची मुदत होती. हा IPO फक्त 2.59 पटीने सबस्क्राइब झाला. ज्यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 4.17 पटीने सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 1.23 पटीने सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार केवळ 23 टक्के कोटा भरू शकले. Kefin Technologies ने IPO द्वारे 1500 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने 10 च्या दर्शनी मूल्याच्या शेअरसाठी, IPO ची किंमत 347-366 दरम्यान कंपनीने निश्चित केली होती.

शेअर बाजारातील पडझडीचा परिणाम?

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम लँडमार्क कार्सच्या आयपीओ लिस्टिंगवर झाला. लँडमार्क कार्सच्या आयपीओत 506 रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती. बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर लँडमार्क कार्सच्या शेअर दरात घसरण सुरू आहे. सध्या या कंपनीचा शेअर 452 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. Abans Holdings कंपनीच्या शेअर दरात लिस्टिंगनंतर घसरण सुरू आहे. 

(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.) 

महत्त्वाच्या बातम्या

एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget