एक्स्प्लोर

कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

आरबीआयने आर्थिक वाढीचा अंदाज सुधारला आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) चलनविषयक धोरण समितीने (MPC) सलग बैठकीत एकमताने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, 'न्यूट्रल' धोरणात्मक भूमिका कायम ठेवत भविष्यातील निर्णय महागाई आणि आर्थिक वाढीच्या बदलत्या समीकरणांवर अवलंबून असतील, असे स्पष्ट केले आहे. पुरवठा-पक्षातील महागाईचा दबाव, दक्षिण-पश्चिम मान्सून, एल निनो, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि जागतिक व्यापार (Bank) धोरणातील अनिश्चितता या प्रमुख जोखमींवर आरबीआयने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. रेपो रेट जैसे थे ठेवल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे.  

आरबीआयने आर्थिक वाढीचा अंदाज सुधारला आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी पहिल्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमी महागाईमुळे वार्षिक ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाईचा अंदाज 5.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. मात्र, अन्नधान्य आणि इंधनाच्या किमतींमुळे तिसऱ्या तिमाहीत महागाई वाढण्याची शक्यता कायम असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

*फेडरल बँकेचे ग्रुप प्रेसिडेंट आणि ट्रेझरी प्रमुख लक्ष्मणन व्ही* यांनी सांगितले की, "एमपीसीने एकमताने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवत 'न्यूट्रल' भूमिका कायम ठेवली आहे. पहिल्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा कमी महागाईमुळे वार्षिक CPI महागाईचा अंदाज 5.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वाढीच्या चांगल्या कामगिरीमुळे वार्षिक जीडीपी वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. भविष्यातील व्याजदरांबाबत आरबीआयने 'वेट अँड वॉच'ची भूमिका स्वीकारली असून, मान्सून, एल निनो, भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक व्यापार धोरण या घटकांवर पुढील निर्णय अवलंबून राहतील."

RBI च्या निर्णयाचे स्वागत

इनक्रेड मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुप्पा यांनीही आरबीआयच्या निर्णयाचे स्वागत केले. "रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय आमच्या अपेक्षेनुसारच आहे. मध्यवर्ती बँक दीर्घकालीन स्थैर्याला प्राधान्य देत आहे, मात्र आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करण्याची लवचिकताही तिने कायम ठेवली आहे. अपेक्षेपेक्षा चांगली आर्थिक वाढ आणि कमी महागाई पाहता सध्याची स्थिती काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी ही स्थिरता सकारात्मक आहे. महागाई, आर्थिक वाढ आणि तरलतेबाबतचे आरबीआयचे संकेत वित्तीय बाजारासाठी अनुकूल असून, जागतिक परिस्थिती स्थिर राहिल्यास रोखे उत्पन्न (Bond Yields) आणि रुपया मर्यादित पट्ट्यात राहू शकतो," असे त्यांनी नमूद केले.

बजाज ब्रोकिंगचे फंडामेंटल अॅनालिस्ट शाश्वत सिंह यांच्या मते, "पुरवठा-पक्षातील महागाईच्या दबावामुळे रेपो दरात बदल करण्यात आलेला नाही. खासगी उपभोग, गुंतवणूक आणि सेवा तसेच वस्तू निर्यातीमुळे देशांतर्गत आर्थिक वाढ मजबूत आहे. मात्र, अन्नधान्य आणि इंधनाच्या किमतींमुळे वाढणारी महागाई, पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकन फेडरल रिझर्व्हची भूमिका आणि एल निनोमुळे मान्सूनवर होणारा परिणाम हे पुढील काळातील महत्त्वाचे जोखीम घटक असतील. त्यामुळे भविष्यातील धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी आरबीआय मान्सून, एल निनो आणि जागतिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवेल."

आरबीआयनेही आपल्या धोरणात्मक निवेदनात स्पष्ट केले आहे की, सध्याची महागाई प्रामुख्याने अन्नधान्य आणि इंधनाच्या पुरवठा-पक्षातील कारणांमुळे वाढली असून ती अद्याप व्यापक स्वरूपात अर्थव्यवस्थेत पसरलेली नाही. त्यामुळे व्याजदरात तातडीने बदल करण्याऐवजी परिस्थितीचा बारकाईने आढावा घेण्याची भूमिका अधिक योग्य असल्याचे एमपीसीचे मत आहे.

हेही वाचा

मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Embed widget