चिकन 1800 रुपये किलो, अंडे 50 रुपये; कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय करा, मालामाल व्हा
कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय (Kadaknath Chicken farming) हा तरुणांना मोठा पैसा कमावून देणारा व्यवसाय आहे. कडकनाथ कोंबडी ही इतर कोंबड्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
Kadaknath Chicken farming : अलिकडच्या काळात अनेक तरुण वेगवेगळ्या व्यवसायात उतरत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून मोठा नफा कमावत आहेत. असाच एक व्यवसाय म्हणजे कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय (Kadaknath Chicken farming). हा व्यवसाय तरुणांना मोठा पैसा कमावून देणारा व्यवसाय आहे. कडकनाथ कोंबडी ही इतर कोंबड्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. जाणून घेऊयात कडकनाथ कोंबडीबद्दल सर्व माहिती.
ज्या तरुणांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय उत्तम आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तरुण चांगला नफा कमावू शकतात. कारण, या कोंबडीच्या चिकनला मोठी मागणी आहे. त्याचा दरही इतर कोंबडीच्या दरापेक्षा जास्त आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कोंबडी आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
कडकनाथ कोंबडी प्रतिकिलो 1800 रुपये
कडकनाथ कोंबडी ही काळ्या रंगाची असतेच तसेच तिची चोच देखील काळ्या रंगाची असते. तसेच या कोंबडीचे रक्तही काळे असून मांस आणि अंडे देखील काळ्या रंगाचेच असते. ही कोंबडी पाच ते सहा महिन्यात तयार होते. तसेच या कोंबडीच्या चिकनचा दर हा प्रतिकिलो 1800 रुपये आहे. त्यामुळं कडकनाथ कोंबडी व्यवसायिकांना मोठा नफा मिळवून देणारी कोंबडी आहे.
कडकनाथ कोंबडीचे चिकन हे आरोग्यासाठी चांगले
कडकनाथ कोंबडीचे चिकन हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. या कोंबडीच्या चिकनमध्ये अनेक पोषक घटक असतात. कोंबडीचे चिकन हे प्रथिनेयुक्त असते. विशेषत: बॉडी बिल्डिंग करणारे तरुण कडकनाथ कोंबडीचे चिकना खातात. या चिकनची चव आणि दर्जा देखील इतर कोंबड्यांच्या चिकनपेक्षा चांगला असतो. त्यामुळं दिवसेंदिवस कडकनाथ कोंबडीला मागणी वाढत आहे. याचा कोबंडी पालन करणाऱ्या व्यवसायिकांना मोठा फायदा होत आहे.
कमी काळात अधिक नफा
कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय हा कमी काळात अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. चार पाच महिन्यात कोंबडी तयार होते. बाजारात या कोंबडीच्या चिकनला 1200 ते 1800 रुपयांचा दर मिळत आहे. तर या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत ही 50 रुपये आहे. विशेष म्हणजे या कोंबड्याच्या संगोपणाचा खर्चही येतो आणि नफा जास्त मिळतो. त्यामुळं या कोंबडीचा व्यवसाय करणं परवडते. या कोंबड्या प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये आढळतात. अलिकडच्या काळात तामिळनाडू, बिहार, आंध्र प्रदेशमध्ये कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: