(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sajjan Jindal : उद्योजक सज्जन जिंदाल यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप; मॉडेलचे आरोप जिंदल यांनी फेटाळले, म्हणाले...
Sajjan Jindal Reacts On Rape Allegations : उद्योजक सज्जन जिंदाल यांनी आपल्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Sajjan Jindal Reacts On Allegations : उद्योजक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र, जिंदाल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप निराधार असून आपण तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचे सज्जन जिंदाल यांच्याकडून सांगण्यात आले. जिंदाल यांच्याविरोधात एफआयआर (FIR Against Sajjan Jindal) दाखल झाल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर जिंदाल यांनी एका निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, जिंदाल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "तपासात पूर्ण सहकार्य करण्यास ते वचनबद्ध आहेत. तपास चालू असल्याने आम्ही त्यावर अधिक भाष्य करणार नाही." याशिवाय, मीडियाला कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेसोबत कुठे भेट?
जिंदालवर आरोप करणाऱ्या महिलेचे म्हणणे आहे की, ती 64 वर्षीय जिंदालला काही वर्षांपूर्वी दुबईत एका क्रिकेट सामन्यात भेटली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली. तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार ती महिला एक अभिनेत्री आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
30 वर्षीय मॉडेलने जिंदाल यांच्यावर जानेवारी 2022 मध्ये त्याच्या कंपनी JSW ग्रुपच्या मुख्यालयात तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सज्जन जिंदाल यांनी तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कंपनीच्या मुख्यालयाच्या पेंटहाऊसमध्ये हा गुन्हा घडल्याचे महिलेने सांगितले.
मॉडेलने सांगितले की, कथित बलात्कारापूर्वी ते दक्षिण मुंबईतील जिंदाल मॅन्शनमध्ये भेटले होते आणि फिरायला गेले होते. पीडित महिलेचे म्हणणे आहे की, कथित बलात्कारानंतर सज्जन जिंदाल तिला टाळत होता.
13 डिसेंबर रोजी एफआयआरची नोंद
13 डिसेंबर रोजी, महिलेच्या तक्रारीवरून, जिंदाल यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 354 (महिलेचा विनयभंग) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. पीडित तरुणीने या प्रकरणात कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आला.
'भावाकडून मालमत्ता खरेदी करण्यात रस दाखवला'
महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले की, जिंदाल यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर मैत्रीचे नाते तयार झाले. त्यानंतर फोन क्रमांकाची देवाण-घेवाण झाली. त्यांनी माझ्या भावाकडून मालमत्ता विकत घेण्यास स्वारस्य दाखवले होते. जिंदाल यांनी तिला 'बेब' आणि 'बेबी' असे संबोधण्यास सुरुवात केली. आम्ही पहिल्यांदा एकटे भेटलो तेव्हा त्याने मला त्यांनी त्यांच्या विवाहाशी संबंधित अडचण सांगितली. ही बाब मला विचित्र वाटली असल्याचेही पीडितेने सांगितले.
'पोलिसांशी संपर्क साधल्यास परिणाम भोगण्याची धमकी'
फिर्यादीत म्हटले पीडित तरुणीने म्हटले की, जिंदाल यांनी तिला मिठी मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर फ्लर्टिंगसारखे कृत्य करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिला अवघडल्यासारखे वाटू लागले. महिलेने दावा केला की जानेवारी 2022 मध्ये जिंदाल यांनी तिला पेंटहाऊसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढेच नाही तर जून 2022 मध्ये माझा नंबर ब्लॉक करण्यापूर्वी जिंदाल यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती, असेही तरुणीने म्हटले.