एक्स्प्लोर
IPO Update : सेनोर्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडचा IPO 93.69 पट सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर ?
IPO Update : गुजरातमधील फार्मा कंपनी सेनोर्स फार्मास्युटिकल्स लिमिटेडचा आयपीओ 93.69 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. हा आयपीओ 30 डिसेंबर लिस्ट होणार आहे.

आयपीओ अपडेट
1/5

औषध उत्पादक कंपनी सेनोर्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड चा 582 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ खुला झाला होता. या आयपीओला 93.69 पट सबस्क्राइब करण्यात आलं आहे.
2/5

एनएसईवरील आकडेवारीनुसार कंपनीनं 85,34,681 शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी 79,95,96,646 शेअरच्या बोली लागल्या.
3/5

गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 96.30 पट, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 94.66 पट आणि रिटेल गुंतवणूकदारांनी 90.46 पट सबस्क्राइब केला.
4/5

सेनोर्स फार्मास्युटिकल्सने आयपीओ खुला होण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 261 कोटी रुपये उभारले होते.
5/5

सेनोर्सनं आयपीओचा किंमतपट्टा 372-391 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. अहमदाबादच्या या कंपनीनं 500 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी केले आहेत. तर, 82.11 कोटी रुपयांच्या ऑफर फॉर सेलच्या शेअरचा समावेश होता. सेनोर्स फार्माच्या आयपीओचा जीएमपी 61 टक्क्यांवर असून त्यानुसार आयपीओ लिस्ट झाल्यास 240 रुपये प्रतिशेअर नफा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. हा आयपीओ 30 डिसेंबरला शेअर बाजारात लिस्ट होणार आहे.(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Dec 2024 11:09 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
