एक्स्प्लोर

ITR Filing Form 16: फॉर्म 16 नसला तरी ITR दाखल करू शकता; अशी आहे संपूर्ण प्रोसेस

Filing ITR : तुमच्याकडे फॉर्म 16 नसला तरी तुम्हाला आयकर विवरण दाखल (ITR Filing) करता येणार आहे. जाणून घ्या पद्धत...

Filing ITR without Form 16: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) अर्थात आयकर विवरण भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे. आयकर विवरणपत्र भरताना अनेक प्रकारची कागदपत्रेही आवश्यक असतात. फॉर्म 16 हे देखील या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक पगारदार व्यक्तीला आयकर रिटर्न भरण्यासाठी फॉर्म 16 आवश्यक आहे. आयकर विभागाने केलेल्या नियमांनुसार, प्रत्येक कार्यालयाने आपल्या TDS उत्पन्न कर्मचार्‍यांसाठी फॉर्म 16 जारी करणे बंधनकारक आहे. तथापि, जर तुम्हाला फॉर्म 16 जारी केला गेला नसेल आणि तुम्ही पगारदार व्यक्तींच्या श्रेणीत येत असाल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हीदेखील फॉर्म 16 शिवाय तुमचा आयकर रिटर्न भरू शकता. 

फॉर्म 16 शिवाय ITR करा दाखल 

तज्ञांच्या मते, पगारदार व्यक्ती फॉर्म 16 शिवाय देखील त्यांचा ITR दाखल करू शकतात. यासाठी त्यांना पेमेंट/सॅलरी स्लिप आणि फॉर्म 26AS सारख्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

फॉर्म 16 शिवाय आयटीआर फाइल करण्यासाठी, एखाद्याने संबंधित आर्थिक वर्षाशी संबंधित सर्व पगाराच्या स्लिप एकत्र केल्या पाहिजेत. या स्लिप्समध्ये पगार, भत्ते, कपाती आणि इतर कपातीचा तपशील असावा. याशिवाय पगार स्लिप, भत्ता आणि बोनस यांचा समावेश करून उत्पन्न मोजावे.

बँक अकाउंटचे तपशील आवश्यक

फॉर्म 16 शिवाय ITR दाखल करण्यासाठी, करदात्यांनी व्याज, लाभांश आणि इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न यांसारख्या वेतनाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न मोजायला हवेत. ही सगळी रक्कम करपात्र उत्पन्नात समाविष्ट केल्या पाहिजेत. याशिवाय, फॉर्म 26AS व्हेरिफाय करणे देखील महत्त्वाचे आहे. फॉर्म 26AS तुमच्या पॅन कार्डवर कापलेल्या सर्व करांचा तपशील देतो. याशिवाय, फॉर्म 26AS मध्ये नमूद केलेल्या TDS तपशील आणि आयकरातील  उत्पन्नाच्या तपशीलाशी जुळते का, हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. या तपशीलात काही फरक असल्यास तुम्हाला तुमच्या कार्यालयात किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. तसेच ते दाखल केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय करावे लागेल. व्हेरिफाय केल्याशिवाय तुमची आयटीआर फाइलिंग अपूर्ण मानली जाईल.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत (ITR Filing Deadline) 31 जुलै आहे. तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरु शकता. मुदत संपल्यानंतर तुम्ही दंडाच्या रक्कमेसह आयकर रिटर्न भरू शकता. शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. अनेकदा आयकर खात्याच्या साइटवर ट्राफिक वाढल्याने साइटवर प्रॉब्लम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर आयकर भरता येईल, तेवढ्या लवकर हे सोपस्कार पार पाडावेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

व्हिडीओ

MNS AB Form Mumbai Elections मनसेकडून उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात,उमेदवारांना काय वाटतं?
Rakee Jadhav Join BJP : तिकीटाविना बंड, नाराजी उदंड, राखी जाधव भाजपात!
NCP VS NCP Alliance : घड्याळ, तुतारीच्या आघाडीची अजितदादांकडून घोषणा! Special Report
Sharad Pawar on Election 2026 : पुण्यात पुतण्यासोबत, मुंबईत 'ठाकरे'बंधूंसोबत?
Zero Hour : पालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास, सर्वाधिक बंडखोरी कोणत्या पक्षात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget