जर तुम्ही ITR शी संबंधित 'हे' काम केलं नसेल तर टॅक्स रिफंड विसरा; एक रुपयाही परत मिळणार नाही
Income Tax Refund: इनकम टॅक्स रिफंड फाईल केलाय, परंतु आतापर्यंत आयटीआरशी संबंधित महत्त्वाचं काम केलेलं नाही, तर आयकर विभाग तुम्हाला टॅक्स रिफंड देणार नाही.
ITR Filing: इनकम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती, ज्यांनी या मुदतीपर्यंत टॅक्स रिटर्न भरलेलं नाही. ते बिलेटेड आयटीआर (ITR) फाईल करू शकतात. दरम्यान, जर तुम्ही आयकर रिटर्न भरलं असेल आणि रिटर्नची वाट पाहत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती माहिती असणं आवश्यक आहे.
आयकर विभागाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, जर तुम्ही रिटर्न भरलं असेल, पण तुम्हाला अद्याप रिफंड मिळाला नसेल, तर आयकर विभागानं तुमचा रिफंड आतापर्यंत रोखून ठेवलेला असू शकतो. 2022-23 आर्थिक वर्षाच्या इनकम टॅक्स रिटर्नवर रिफंड मिळविण्यासाठी, तुम्हाला आयटीआर व्हेरिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे.
ITR व्हेरिफिकेशन करणं गरजेचं
तुमचा आयटीआर भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे. यापूर्वी ही मुदत 120 दिवसांची होती. दरम्यान, आयकर विभागानं 1 ऑगस्ट 2022 पासून आयटीआर पडताळणीची अंतिम मुदत 30 दिवसांपर्यंत कमी केली आहे. या वेळेच्या आत तुमचं इनकम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन पूर्ण झालं नाहीतर, आयकर विभागाच्या वतीनं ही प्रक्रिया अपूर्णच मानली जाईल. याचाच अर्थ असा की, तुम्ही आयटीआर भरला असला तरी त्याचं व्हेरिफिकेशन पूर्ण न झाल्यामुळे तुमचं आयटीआर प्रोसेस केलं जाणार नाही.
कोणताही टॅक्स रिफंड मिळणार नाही
जर तुम्ही तुमचा आयटीआर दिलेल्या मुदतीत भरला नाही आणि त्याचं व्हेरिफिकेशनही केलं नाही, तर तुम्हाला कोणताही कर परतावा दिला जाणार नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आयटीआर भरून तो व्हेरिफाय करणाऱ्यांनाच टॅक्स रिफंड दिला जातो.
ITR भरल्यानंतर ऑनलाईन ई-व्हेरिफाय कसं करावं?
इनकम टॅक्स रिटर्नची पडताळणी सहा प्रकारे करता येते. आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून, तुमच्या पूर्व-प्रमाणित बँक खात्याद्वारे ईव्हीसी, डीमॅट खात्याद्वारे तयार केलेलं ईव्हीसी, एटीएम किंवा नेट बँकिंगद्वारे ईव्हीसी आणि डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र पाठवून ई-व्हेरिफिकेशन करता येतं.
तुमचा आयटीआर ई-व्हेरिफिकेशन झाला आहे की नाही? हे कसं कळेल?
व्हेरिफिकेशन दरम्यान, आयकर विभागाकडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. मेसेजमध्ये ई-व्हेरिफिकेशनची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर तुमचं ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे की नाही, याचीही माहिती ईमेलद्वारे दिली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :