भारत आणि इस्रायलमध्ये सहा लाख कोटींचा व्यवसाय, अदीनींचीही गुंतवणूक; युद्धाचा व्यापारावर परिणाम?
इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine Conflict) यांच्यातील युद्धाचा परिणाम भारत आणि इस्रायल यांच्यातील व्यापारावर होण्याची शक्यता आहे.
israel palestine conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel Palestine Conflict) यांच्यात चांगलाच संघर्ष पेटला आहे. सध्या इस्रायलकडून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासवर बॉम्बफेक सुरुच आहे. इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गाझा आणि दक्षिण इस्रायलमध्ये हमाससोबत सुरू असलेल्या लढाईत शेकडो दहशतवादी ठार झाले आहेत. तर अनेकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. वास्तविक, इस्रायलने दक्षिण भागात दहशतवाद्यांशी लढा देत हवाई हल्ल्यात गाझामधील अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत. दरम्यान, या युद्धाचा परिणाम भारत आणि इस्रायलमध्ये यांच्यात असणाऱ्या व्यापारावर होत आहे.
भारत आणि इस्रायल यांच्यात हिऱ्यांचा मोठा व्यापार
भारत आणि इस्रायल या दोन्ही देशादरम्यान मोठा व्यापार चालतो. भारत आणि इस्रायलमध्ये 6 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय चालतो. गौतम अदानी यांनी देखील पैसे गुंतवले आहेत. गेल्या वर्षी गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स कंपनीने इस्रायलसोबत करार केला होता. हा करार 1.8 अब्ज डॉलर्सचा होता. भारत आणि इस्रायलमध्ये बंदरे आणि शिपिंग व्यतिरिक्त हिऱ्यांचाही व्यापार होतो. भारत आणि इस्रायलच्या एकूण व्यवसायात हिऱ्यांच्या व्यवसायाचा मोठा वाटा आहे.
इस्रायलमधील व्यापार सातत्याने वाढत आहे
इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात. दोन्ही देशांचा व्यवसायही विस्तारत आहे. भारत आणि इस्रायलमधील व्यापार सातत्याने वाढत असल्याची माहिती इस्रायलच्या राजदूताने या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिली होती. दोन्ही देशांमधील व्यापार पूर्वी 5 अब्ज डॉलर्सचा होता, जो आता 7.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. भारत आणि इस्रायलचा व्यवसाय बंदरे आणि शिपिंगसह अनेक क्षेत्रांमध्ये अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.
गौतम अदानी यांची मोठी गुंतवणूक
देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनीही इस्रायलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी गौतम अदानी यांच्या अदानी पोर्ट्स या कंपनीने निविदा जिंकली होती. हा करार 1.8 अब्ज डॉलर्सचा होता. या करारामध्ये अदानीची कंपनी अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि इस्रायली कंपनी गॅडोट ग्रुप यांच्यात करार करण्यात आला. या दोन कंपन्यांनी मिळून हैफा बंदराच्या खासगीकरणाची निविदा जिंकली. या कंसोर्टियममध्ये गौतम अदानी यांच्या कंपनीची हिस्सेदारी सुमारे 70 टक्के असल्याचे सांगितले जाते. खरे तर हे बंदर इस्रायलचे शिपिंग कंटेनर्समधील सर्वात मोठे बंदर मानले जाते. आता युद्धासारख्या परिस्थितीत कंपनी यावर काय बोलते हे पाहावे लागेल.
हिरे व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता
भारत आणि इस्रायलमध्ये बंदरे आणि शिपिंग व्यतिरिक्त हिऱ्यांचाही व्यापार होतो. भारत आणि इस्रायलच्या एकूण व्यवसायात हिऱ्यांच्या व्यवसायाचा मोठा वाटा आहे. 1990 पर्यंत दोन्ही देशांमध्ये दरवर्षी 200 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार होत होता. जो आता अब्जावधी डॉलर्सवर पोहोचला आहे. यामध्ये हिऱ्यांच्या द्विपक्षीय व्यापाराचा वाटा जवळपास 50 टक्के आहे.
इस्रायलचा हमासला इशारा
इस्रायलने या युद्धासंदर्बात हमासला इशारा दिला आहे. या युद्धाची किंमत हमासला चुकवावी लागेल असा इशारा इस्रायलने दिला आहे. भारत सरकारने आपल्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. दरम्यान, एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. भारत आणि इस्त्रायल यांच्यात मोठा व्यवसाय चालतो. देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनीही इस्रायलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: