सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी
Sachin Tendulkar Investment : इनव्हेस्टमेंटच्या मैदानावरही सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar IPO) जोरदार फलंदाजी सुरु आहे. सचिन तेंडुलकरने पाच कोटींची गुंतवणूक केली होती, त्याचे नऊ महिन्यात 23 कोटी रुपये झाले आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकरला तब्बल 18 कोटींचा नफा झालाय.
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar IPO) इनव्हेस्टमेंटच्या (Investment) मैदानावरही जोरदार फलंदाजी सुरु आहे. सचिन तेंडुलकरने नऊ महिन्यापूर्वी एका कंपनीमध्ये पाच कोटींची गुंतवणूक केली होती, त्याचे आचा 23 कोटी रुपये झाले आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकरला तब्बल 18 कोटींचा नफा झालाय. सचिन तेंडुलकरला नऊ महिन्यात तब्बल 360 टक्के रिटर्न मिळाले आहेत. पाहूयात सचिन तेंडुलकरने केलेल्या गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊयात..
पाच कोटींची गुंतणूक -
सचिन तेंडुलकरने सहा मार्च रोजी इंजिनिअरिंग आणि टेक्नोलॉजी सोल्यूशन्स देणारी कंपनी आझाद इंजिनिअरिंग कंपनीमध्ये (Azad Engineering IPO) पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आझाद इंजिनिअरिंग कंपनी ही एक टर्बाइन आणि एरोस्पेस पार्ट्स उत्पादक कंपनी आहे. कंपनीची उत्पादने एरोस्पेस आणि संरक्षण, ऊर्जा, तेल आणि वायू उद्योगांना पुरवते. आझाद इंजिनिअरिंग कंपनीने नुकताच बाजारात आपला आयपीओ आणला होता. त्याला मार्केटमध्ये चांगला रिस्पॉन्स मिळालाय. सचिन तेंडुलकरने आझाद इंजिनियरिंग कंपनीचे 4,38,210 शेअर घेतले आहेत.
आझाद इंजिनिअरिंग कंपनीच्या ग्राहकांच्या यादीमध्ये जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल इंक., मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड, सीमेन्स एनर्जी, ईटन एरोस्पेस आणि MAN एनर्जी सोल्युशन्स एसई आदी कंपन्यांचा समावेश आहे. IPO मध्ये प्रति शेअर किंमत 499 रुपये ते 524 रुपये इतकी आहे.
सचिनला आणखी नफा होऊ शकतो -
हैदराबादस्थित आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ (Azad Engineering IPO) पुढील आठवड्यात बाजारात येणार आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये इश्यूची किंमत 524 रुपये ठेवली आहे. जर या दराने आयपीओ लिस्टिंग झाला तर सचिन तेंडुलकरचे 5 कोटी रुपये थेट 22.96 कोटी रुपये होतील. सचिनला IPO मधून मल्टीबॅगर परतावा मिळेल. लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीच्या शेयर्सवर सर्वांची नजर असेल. शेअर्स वाढले अथवा घटले तर सचिन तेंडुलकरला रिर्टन मिळणारी रक्कमही कमी-जास्त होऊ शकते. ग्रे मार्केटमध्ये या 740 कोटी रुपयांच्या IPO चा प्रीमियम 65 टक्क्यांवर आहे. सचिन तेंडुलरकरने 114.1 रुपये किमतीला कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. कंपनीचे शेअर्स जितके जास्त सूचीबद्ध असतील, तितके गुंतवणूकदारांना अधिक फायदे मिळतील.
या दिग्गजांचाही कंपनीत गुंतवणूक -
सचिन तेंडुलकरशिवाय अन्य अनेक खेळाडूंनी आझाद इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक केली आहे. पीव्ही सिंधू(PV Sindhu), सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनीही आझाद इंजिनिअरिंग लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली आहे. या तिन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सचिन तेंडुलकरनंतर आठवडाभरांनी या खेळाडूंनी गुंतवणूक केली. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी 228.17 रुपयांना स्टेक खरेदी करावा लागला होता. या तिघांची एक कोटी रुपयांची गुंतवणूक 130 टक्केंनी वाढून 2.3 कोटींच्या आसपास पोहचली असेल.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
5 पैशाची काडीपेटी आता 2 रुपयाला, जाणून घ्या काडीपेटीचा इतिहास