वेगवान आणि विस्तृत ट्रेडिंग अनुभवासाठी वझीरएक्स 3.0 चे अनावरण
WazirX : वझीरएक्स 3.0 हे वेब 3 सेवांच्या गरजा ध्यानात घेऊन बनवण्यात आले असून त्यात अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये एकीकृत केली आहेत.
मुंबई : आकारमानानुसात भारतातील सर्वात मोठा क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज असलेल्या वझीरएक्स ने वझीरएक्स 3.0 या त्यांच्या खूप अपेक्षित नवीन युजर इंटरफेसेस पैकी एकाचे पदार्पण केले आहे. हे महत्त्वाचे अपडेट अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्ये सोबत आणते जी ट्रेडिंगचा अनुभव वृद्धिंगत करते आणि त्यामुळे ते अधिक वेगवान, अधिक विश्वासार्ह आणि खूप माहितीपूर्ण बनते.
एका बुल (तेजी)च्या मार्केटच्या अपेक्षांसह, वाढता वापरकर्ता उत्साह आणि ट्रेडचे वाढणारे आकारमान यांची योग्य प्रकारे दखल घेणे आवश्यक आहे. वझीरएक्स 3.0 हे वेब 3 सेवांच्या गरजा ध्यानात घेऊन बनवण्यात आले असून त्यात अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये एकीकृत केली आहेत जी ट्रेडिंगची प्रक्रिया सुकर करते व एका दृष्टीक्षेपात समावेशक अंतर्दृष्टी उपलब्ध करून देते.
वझीरएक्सचे उपाध्यक्ष राजगोपाल मेनन म्हणाले, आमच्या युजरसच्या सेवेत वझीरएक्स 3.0 सादर करतांना आम्ही उत्साहित आहोत जे आमच्या ट्रेडर्सच्या उच्च मापदंडांची पूर्ती तर करतेच पण ते व्यवसायात एक नवीन उच्चांक प्रस्थापित करते, वझीरएक्स 3.0 ही एक अविरत, नाविन्यपूर्ण आणि कार्यक्षम ट्रेडिंग अनुभव देण्याच्या दिशेत एक लक्षणीय झेप आहे. आमचा विश्वास आहे की या सुधारणा आमच्या युजर्सना Web.3 सह अधिक अनुकूल होण्यास व आत्मविश्वास व अचूकतेने ट्रेड करण्यात सक्षम करतील."
वझीरएक्स 3.0 ची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:
ट्रेडिंग टर्मिनलवरच ऑर्डर बुक: ट्रेडर्स आता ऑर्डर्स तयार करू शकतात आणि त्यांच्या ओपन ऑर्डर्सची कल्पना अव्याहतपणे घेऊ शकतात. ऑर्डर बुक ट्रेडिंग टर्मिनलच्या बाजूस सोयिस्करपणे ठेवलेले असते ज्यामुळे कोणताही व्यवहार न मुकता युजर्स सक्रीय असतात याची खात्री होते.
ओपन ऑर्डर्स: ट्रेडर्स आता त्यांच्या ओपन ऑर्डर्स ट्रेड टर्मिनलच्या बरोबर खाली पाहू शकतात ज्यामुळे इतर पानांवर शोधत जाण्याची आवश्यकता नाहीशी होते. या सुधारणेमुळे महत्त्वाची माहिती लगेच मिळवण्याजोगी बनते आणि ऑर्डर व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढते.
फंड्स/निधी प्रदर्शन: मार्केटशी संबंधित निधी आता ठळकपणे दिसतात. उदा: बीटीसी/आयएनआर मार्केटमध्ये, युजर्स आता त्यांची एकूण आयएनआर शिल्लक, एकूण बीटीसी होल्डिंग्ज आणि सरासरी खरेदी किंमत आणि त्या संपत्तेसाठी नफा व तोटा (पीएनएल) यासारखी सविस्तर माहिती पाहू शकतात.
मार्केट स्विचर: मार्केट स्विच करणे इतके सोपे कधीच नव्हते. युजर्सना मार्केट्सच्या पूर्ण यादीकडे पुन्हा वळण्याची गरज नाही. वरच्या बाजूस उजवीकडे मार्केटच्या नावावर ( उदा: BTC/INR) नुसते टॅप करा आणि अलिकडे भेट दिलेली मार्केट्स, फेवरेट्स/पसंत, मूळ चलन ( उदा: बीटीसी/युएसडीटी, बीटीसी/डब्ल्यूआरएक्स) या तीन याद्या दाखवणारा एक जलद पॉप अप येईल.
हे नवीन वेब ३ अनुकूल इन-ॲप वैशिष्ट्ये व एकीकरणांपैकी एक आहे जे वझीरएक्स जे येत्या काही महिन्यांतच सादर करणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्युच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)