Infosys Narayana Murthy : चार महिन्यांचा चिमुकला 240 कोटींचा मालक, नारायण मूर्तींचा मोठा निर्णय; कोण आहे हा नशीबवान?
Infosys Shares : इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांनी 240 कोटी रुपयांचे शेअर्स त्यांच्या चार महिन्यांच्या नातवाच्या नावावर केले आहेत.
Infosys Shares Narayana Murthy : इन्फोसिसचे (Infosys) फाऊंडर नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी त्यांच्या नातवाला मोठी भेट दिली आहे. नारायण मूर्ती यांनी त्यांच्या नावे असलेले दिग्गज टेक कंपनी इन्फोसिसचे कोट्यवधींचे शेअर्स नातवाच्या नावावर केले आहेत. यामुळे नारायण मूर्ती यांचा कंपनीमधील भागीदारी फक्त 0.36 टक्के झाली आहे. इन्फोसिस कंपनीने इक्सचेंज फाईल करताना ही माहिती दिली आहे.
इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्तींचा मोठा निर्णय
इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसमधील त्यांचे 240 कोटी रुपयांचे शेअर्स नातवाच्या नावावर केले आहे. नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 0.40 टक्के शेअर्समधील 0.04 टक्के शेअर्स नातू एकाग्र रोहन मूर्ती याच्या नावे केले आहेत. या 0.04 टक्के शेअर्सची शेअर बाजारातील किंमत 240 कोटी रुपये दिली आहे. यामुळे नारायण मूर्ती यांच्याकडे यापुढे 0.36 टक्के शेअर्स असतील. एक्सचेंज फाईल करताना इन्फोसिसने हा अहवाल दिला आहे.
चार महिन्यांचा चिमुकला 240 कोटींचा मालक
नारायण मूर्ती यांनी नातू एकाग्र रोहन मूर्ती (Ekagrah Rohan Murthy) याच्या नावावर इन्फोसिसचे 0.04 टक्के शेअर्स म्हणजे 240 कोटी रुपयांचे शेअर्स केले आहेत. नारायण मूर्ती यांचा नातू आता अवघ्या चार महिन्यांचा आहे. सध्या या शेअर्सचे बाजारमूल्य अंदाजे 240 कोटी रुपये आहे. त्यामुळे अवघ्या चार महिन्यांचा एक्राग 240 कोटींचा मालक झाला आहे.
एकाग्रकडे इन्फोसिसचे 15,00,000 शेअर्स
इन्फोसिसच्या एक्स्चेंज फाइलिंगमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, इन्फोसिसचे फाऊंडर नारायण मूर्ती यांनी नातू एकग्र मूर्तीला सुमारे 240 कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत. यानंतर, एकगराकडे देशातील दुसरी सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या इन्फोसिसचे 15,00,000 शेअर्स असतील. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, आता नारायण मूर्तींकडे 0.36 टक्के शेअर्स शिल्लक आहेत, ज्याचं बाजारमूल्य सुमारे 1.51 कोटी रुपये आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये एकाग्रचा जन्म
नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन नोव्हेंबर 2023 मध्ये पालक झाले आणि नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती आजी-आजोबा झाले. 10 नोव्हेंबर 2023 रोजी बंगळुरुमध्ये एकाग्रचा जन्म झाला. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीचं लग्न ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झालं असून त्यांना दोन मुली आहेत.
1981 मध्ये इन्फोसिसची सुरुवात
नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये इन्फोसिस कंपनी सुरू केली. इन्फोसिस कंपनी मार्च 1999 मध्ये नॅस्डॅक (Nasdaq) वर सूचीबद्ध झाली. अलीकडे, इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह दरम्यान, त्यांनी नॅस्डॅक सूचीचे वर्णन त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणून केले. ते म्हणाले होते की, जेव्हा मी त्या लखलखत्या दिव्यांसमोर बसलो तेव्हा मला खूप अभिमान वाटत होता. इन्फोसिस ही Nasdaq वर सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :