Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; सेन्सेक्स 61500 च्या पार
Stock Market Opening: SGX Nifty हिरव्या चिन्हात व्यवहार करत असून त्यामुळे भारतीय बाजार वेगानं उघडण्याचे संकेत मिळत होते.
Stock Market Opening On 16th February 2023 : आज शेअर मार्केट (Share Market) उघडताच सुरुवातीला सेन्सेक्स (Sensex) 386 अंकांनी वधारला तर निफ्टीत (NIFTY) 105 अंकांची उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील तेजीचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. त्यामुळेच निर्देशांकातही तेजी दिसून आली. ओएनजीसी, पावर ग्रीड, एसबीआय, रिलायन्ससारख्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, आज अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्सही तेजीत आहेत. 7 पैकी 6 कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.
जगभरातील शेअर बाजारातील तेजीमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारच्या व्यापार सत्रात तेजीसह उघडला. आज आशियाई देशांचे शेअर बाजार वेगानं व्यवहार करत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारही तेजीत उघडला. BSE सेन्सेक्स 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला. बाजार सध्या जोमात असून सध्या सेन्सेक्स 386 आणि निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.
आज भारतीय शेअर बाजारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत. बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, फार्मा, मीडिया, ऑइल अँड गॅस, एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजीचे क्रेडिट कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स वधारत आहेत. निफ्टी बँक 200 अंकांच्या वाढीसह 41,920 अंकांवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व 30 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 46 शेअर्स तेजीसह तर केवळ 4 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
कोणते शेअर्स तेजीत?
आजच्या ट्रेडिंग सत्रात टेक महिंद्रा 2.68 टक्के, रिलायन्स 1.14 टक्के, सन फार्मा 1.05 टक्के, कोटक महिंद्रा 0.83 टक्के, एचडीएफसी 0.76 टक्के, एशियन पेंट्स 0.74 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.73 टक्के, टीसीएस 0.67 टक्के, एसबीआय 0.63 टक्के, एचडीएफसी बँक 0.62 टक्क्यांच्या वाढीसह तेजीत व्यवहार करत आहे.
कोणते शेअर्स गडगडले?
ग्रासिम 0.32 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.27 टक्के, हिरो मोटोकॉर्प 0.25 टक्के, बीपीसीएल 0.23 टक्के, एसबीआय लाइफ इन्शुरन्स 0.13 टक्के, इंडिगो 4.14 टक्के, व्होडाफोन आयडिया 1.94 टक्के, चंबळ फर्टिलायझर 1.56 टक्के, इंडिया बाटा 0.56 टक्क्यांच्या घसरणीसह आजच्या ट्रेडिंग सत्रात व्यवहार करत आहेत.
ग्लोबल मार्केटची स्थिती
अमेरिकेत डाऊ जोन्स 39 अंकांनी तर नॅस्डॅक 110 अंकांनी वधारून बंद झाला होता. त्यानंतर आशियाई बाजारात निक्केई 0.73 टक्के, स्ट्रेट टाइम्स 1.23 टक्के, हँगसेंग 2.08 टक्के, तैवान 0.89 टक्के, कोस्पी 1.85 टक्के, शांघाय 0.77 टक्के वाढीसह व्यवहार करत आहे. फक्त जकार्ताच्या बाजारपेठेत घसरण सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :