(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रेन लेट झाली किंवा हुकली तर, चिंता करु नका, रेल्वेकडून फक्त 150 रुपयांमध्ये राहण्याची सुविधा
भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी राहण्याची सुविधा देखील देत आहे. ही सुविधा IRCTC द्वारे प्रदान केली असून, कोणताही प्रवासी बुक करू शकतो.
Indian Railways : भारतीय रेल्वे (Indian Railways) प्रवाशांसाठी राहण्याची सुविधा देखील देत आहे. ही सुविधा IRCTC द्वारे प्रदान केली असून, कोणताही प्रवासी बुक करू शकतो. ही सुविधा प्रवाशांना 150 रुपयांमध्ये दिली जात आहे. एखाद्या प्रवाशाची ट्रेन लेट झाली किंवा काही तासांनंतर त्याला दुसऱ्या ट्रेनमध्ये चढावे लागले, तर रिटायरिंग रूम त्याच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या रुममध्ये प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतात. याचा फायदा म्हणजे काही तासांसाठी तुम्हाला हॉटेल शोधण्याची गरज नाही.
जर तुम्ही स्टेशनच्या आजूबाजूला हॉटेल शोधले तर ते खुप महाग आहेत. त्यामुळ काही तास थांबण्यासाठी ते हॉटेल्स परवडत नाहीत. त्यामुळ रेल्वेच्या रिटायरिंग रूममध्ये तुम्हाला स्वच्छता आणि इतर अनेक सुविधा मिळतात, ज्या प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आरामदायी असतात.
रुमला भाडे हे 100 ते 700 रुपयांपर्यंत
तुम्हाला राहण्यासाठी ज्या रुम आहेत, त्याची किंमत खूप कमी आहे. या रुमला भाडे हे 100 ते 700 रुपयांपर्यंत आहे. एसी आणि नॉन-एसी रुमचे पर्याय आहेत. IRCTC वेबसाइट किंवा अॅपद्वारे रिटायरिंग रूम बुकिंग करता येते. या खोल्या वेगवेगळ्या स्थानकांवर वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील नॉन-एसी रूमची किंमत 12 तासांसाठी 150 रुपये आहे आणि 24 तासांसाठी एसी रूमची किंमत 450 रुपये आहे.
रुम कशी कराल बुक?
तुम्ही या खोल्या 1 तास ते 48 तासांसाठी बुक करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की काही स्थानकांवर, दर तासाच्या आधारावर बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. रिटायरिंग रुम बुक करण्यासाठी, IRCTC साइट किंवा अॅपवर लॉग इन करा, माय बुकिंग पर्यायावर क्लिक करा आणि रिटायरिंग रूम पर्याय निवडा. तुम्ही तिथे पैसे भरून रूम बुक करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर रूम तुमच्या नावावर बुक केली जाईल. मग तुम्ही त्या रुमचा फायदा घेऊ शकता.
महत्त्वाच्या बातम्या: