Indian Railways: तुमचं रेल्वे प्रवासाचं कन्फर्म तिकिट दुसऱ्याला हस्तांतरीत करू शकता? जाणून घ्या पद्धत
Transfer Confirm Train Ticket: तुमच्याकडे असलेले रेल्वेचे कन्फर्म तिकिट तुम्ही इतर प्रवाशाला हस्तांतरीत करू शकता.
Transfer Confirm Train Ticket: काही वेळेस असं होतं की आपण रेल्वे तिकिट आरक्षित (Railway Ticket Reservation) करतो आणि कन्फर्म तिकिट मिळते. मात्र, आपल्याला काही कारणास्तव प्रवासाचा बेत रद्द करावा लागतो. तुमचं कन्फर्म तिकिट दुसऱ्या प्रवाशाला हस्तांतरीत करू शकता. भारतीय रेल्वेने (Indian Railway) याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत. कन्फर्म तिकिट दुसऱ्या प्रवाशाला हस्तांतरीत करता येणे (Confirm Ticket Transfer) शक्य आहे.
भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या या सुविधेमुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे. याआधी कन्फर्म झालेले तिकिट प्रवासाचा बेत रद्द झाल्याने आरक्षित तिकिट रद्द करावे लागत होते. त्यामुळे दंडाचाही भुर्दंड प्रवाशांना बसत होता. आता हा भुर्दंड आणि मनस्ताप होणार नाही. कन्फर्म असलेले तिकिट कोणाला ट्रान्फसर करता येईल, याबाबत भारतीय रेल्वेने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांच्या अनुषंगाने प्रवाशाला आपले कन्फर्म तिकिट इतर प्रवाशाला हस्तांतरीत करता येईल.
कोणाच्या नावे होऊ शकते तिकिट ट्रान्सफर
भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार, जर, तुम्ही तुमच्या रेल्वेच्या कन्फर्म तिकिटावर जर प्रवास करू शकत नाही. तर, हे कन्फर्म तिकिट तुम्ही कुटुंबातील सदस्यांना हस्तांतरीत करू शकता. कुटुंबातील सदस्यांमध्ये वडील, आई, भाऊ, मुलगा, मुलगी, पती अथवा पत्नी यांचा समावेश आहे.
केव्हा करू शकता रेल्वे तिकिट हस्तांतरण
कन्फर्म असलेले रेल्वे तिकिट कुटुंबातील सदस्यांना हस्तांरीत करण्यासाठी तुम्हाला Confirm Ticket Transfer ची विनंती ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी करावी लागेल. जर, तुम्ही एकदा Confirm Ticket Transfer केल्यास तुम्हाला दुसऱ्यांदा तिकिट हस्तांरीत करता येणार नाही.
कन्फर्म तिकिट कसे हस्तांतरीत करणार?
तुमच्याकडे तिकिटाचे प्रिंटआऊट असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तिच्या नावावर तुम्हाला कन्फर्म तिकिट ट्रान्सफर करायचे आहे, त्याकडे आधार कार्ड, मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुम्ही जवळच्या रेल्वे तिकिट आरक्षण खिडकीवर जावे. तिकिट ट्रान्सफरसाठी अर्ज करा.
भारतीय रेल्वेच्या सुचनांनुसार, ट्रेन तिकिट ट्रान्सफर प्रक्रिया रेल्वे सुटण्याच्या 24 तास आधी करावी. सरकारी कर्मचाऱ्यांनादेखील हा नियम आहे. जर, सण-उत्सव अथवा विवाह सोहळ्याचे दिवसत असतील तर, ही वेळ मर्यादा 48 तास असणार.
इतर महत्त्वाच्या बातम्या: