एक्स्प्लोर

विमान प्रवास स्वस्त होणार?IOC कडून ATF च्या दरात कपात

IOC Reduced ATF Prices: इंडियन ऑइल कंपनीने विमान इंधन दरात कपात केली आहे.

ATF Rates Reduced of IOC:  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या प्रभावामुळे अनेक देशांमधील विमान उड्डाणांवर निर्बंध असताना दुसरीकडे भारतीय हवाई क्षेत्रासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर  आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) ATF च्या (एव्हिएशन टर्बाइन फ्यूल) दरात कपात केली आहे. आयओसीने विमान इंधनाच्या दरात 3510.38 रुपये प्रति किलोलीटर कपात केली आहे. त्यानंतर आता इंधन दर  74,022.41 रुपये प्रति किलोलीटर इतके झाले आहेत. विमान इंधनाच्या दरात कपात झाल्याने विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

वेगवेगळ्या शहरातील ATF दर काय?

कपात केल्यानंतरचे नवे दर 16 डिसेंबरपासून लागू होणार आहे. घरगुती विमान कंपन्यांसाठी नवीन दर जाहीर झाले आहेत. दिल्लीमध्ये एटीएएफचा दर 74,022.41 रुपये प्रति किलोलीटर, कोलकातामध्ये 78,215.01 रुपये प्रति किलोलीटर, आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 72,448.20 रुपये प्रति किलोलीटर आणि  चेन्नईमध्ये 76,197.80 रुपये प्रति किलोलीटर इतका दर झाला आहे. विमान इंधन दरात दर 15 दिवसानंतर सुधारीत केले जातात. फेब्रुवारी महिन्यानंतर एटीएफच्या दरात पहिल्यांदा कपात करण्यात आली आहे. 
 
विमान इंधन दर कपातीचा तिकिट दरावर किती परिणाम?

भारतातील एअरलाइन्सच्या खर्चात ATF चा वाटा 30 ते 40 टक्के आहे.  वाढत्या किंवा घसरलेल्या इंधन किमतींचा परिणाम विमान प्रवास दरावरही होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच विमान कंपन्यांना तिकिट दर कमी करण्याच्या शक्यता कमी आहे. कोरोना महासाथीमुळे दीर्घकाळापासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर विमान उड्डाणांवर निर्बंध आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना कोरोनामुळे आणखी तोटा सहन करावा लागला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी विमान कंपन्यांकडून विविध पर्यायांवर विचार केला जात आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Share Market : सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं, सहा कंपन्यांना फटका, स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा
सेन्सेक्सवर चार कंपन्यांचं बाजारमूल्य 1.43 लाख कोटींनी वाढलं,स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget