एक्स्प्लोर

भारतात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले विकासासाठी ७६ हजार कोटींच्या योजनेला मंजुरी

सेमीकंडक्टर आणि  डिस्प्ले बोर्डच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलीय.

नवी दिल्ली -  केंद्रीय मंत्रिमंडळाने  सेमीकंडक्टर (अर्धवाहक चकत्या) आणि  डिस्प्ले (दृश्यपडदा) बोर्डच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन (PLI) योजनेला मंजुरी दिली आहे. सेमीकंडक्टर (semiconductor) निर्मितीला पाया मानून, त्यावर भारताची इलेक्ट्रॉनिक साहित्य निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून उभारणी करण्यासाठी 2 लाख 30 हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यामध्ये  सेमीकंडक्टर चिप्सच्या संपूर्ण इकोसिस्टमचे डिझाइन, फॅब्रिकेशन, पॅकेजिंग, चाचणी आणि विकास यासाठी 76 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आलीय. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाउल टाकले आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक यंत्रणा संरेखन आणि निर्मिती क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात टिकाऊ सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले यांच्या परीसंस्थेच्या विकासासाठी समावेशक कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले यांचे उत्पादन आणि संरेखन या क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल असे अनुदान पॅकेज देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्रात नवे युग सुरु करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु केला जाईल. त्यामुळे धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक स्वावलंबित्व या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रांमध्ये भारताला तंत्रज्ञानविषयक आघाडी घेण्याचा मार्ग सुकर होणार आहे.


उद्योग 4.0 अंतर्गत डिजिटल परिवर्तनाच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी सेमीकंडक्टर  आणि डिस्प्ले हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे पायाचे दगड आहेत. ही अत्यंत गुंतागुंतीची आणि तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रे आहेत. ज्यामध्ये प्रचंड भांडवली गुंतवणूक, मोठी जोखीम, दीर्घ प्रक्रिया आणि परतावा कालावधी आणि तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल अंतर्भूत असणारी आणि लक्षणीय प्रमाणात शाश्वत गुंतवणूक करावी लागणारी प्रक्रिया आहे. हा कार्यक्रम भांडवली पाठबळ आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी यांच्या सुविधा उपलब्ध करून देऊन सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले निर्मिती क्षेत्राला मोठी चालना देईल. सिलिकॉन अर्धवाहक फॅब्स, दृश्यपडदा फॅब्स, संयुक्त अर्धवाहक चकत्या, सिलिकॉन फोटॉनिक्स,  संवेदक फॅब्स, अर्धवाहक पॅकेजिंग यामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या उद्योग संघ यांना आकर्षक मदत निधीचे पाठबळ पुरविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.


भारतात सेमीकंडक्टर फॅब्स आणि डिस्प्ले फॅब्स निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान असणाऱ्या आणि अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्याची क्षमता असणाऱ्या पात्र अर्जदार कंपन्यांना भारतात सेमीकंडक्टर फॅब्स आणि डिस्प्ले फॅब्स उभारण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के आर्थिक मदत दिली जाईल. देशात किमान दोन ग्रीनफील्ड सेमीकंडक्टर फॅब्स आणि दोन ग्रीनफील्ड  डिस्प्ले फॅब्स उभारण्यासाठी अर्ज मंजूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार सर्व राज्य सरकारांसोबत समन्वयाने काम करणार आहे. त्यासाठी जमीन, अर्धवाहक श्रेणीचे पाणी, उच्च द्रजाचे पाणी, वाहातूक सुविधा आणि संशोधन परिसंस्था या आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांचे उच्च-तंत्रज्ञान समूह स्थापन करणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय सेमीकंडक्टर  निर्मिती प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण आणि व्यावासायीकीकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणार आहे. तसे निर्देशही देखील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिले आहेत. एकात्मिक  सर्किट्स, चिपसेट, सिस्टम ऑन चिप्स, सिस्टम आणि आयपी  कोर आणि अर्धवाहक संलग्न रचनेसाठी , अर्धवाहक रचना करणाऱ्या  100 देशांतर्गत कंपन्यांना पाठबळ प्रदान केले जाईल. 1 हजार 500 कोटींपेक्षा जास्त उलाढाल करू शकणाऱ्या अशा किमान 20 कंपन्यांचा विकास येत्या पाच वर्षांत सुकर केला जाणार आहे. 


शाश्वत सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले कार्यक्षेत्र विकसित करण्यासाठी  दीर्घकालीन धोरणे आखण्यासाठी  एक विशेष आणि स्वतंत्र 'भारत अर्धवाहक अभियान' (ISM)ची स्थापना करण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले  उद्योगातील जागतिक तज्ञ भारत सेमीकंडक्टर अभियानाचे नेतृत्व  करतील. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले दृश्य पडदा कार्यक्षेत्रातील योजनांची कार्यक्षम आणि सुरळीत अंमलबजावणीसाठी हे नोडल संस्था म्हणून काम करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget